शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 09:15 IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड; गेल्या १० दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरू होते उपचार

पुणे: ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत. सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. चौकटीबाहेरचा विचार करून, चाकोरी मोडून चित्रपटाची निर्मिती करणारी दिग्दर्शिका हरपल्याची भावना भावे यांच्या निधनामुळे व्यक्त होत आहे.सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे उत्तम चित्रपट त्यांनी तयार केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं कौतुक झालं. अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. भावे यांनी त्यांच्या चित्रपटांमधून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले.  

सुमित्रा भावे यांनी टाटा इन्स्टीट्यूटमधून समाज विज्ञान विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर १० वर्ष त्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिकवत होत्या. १९८५ मध्ये स्त्रीवाणीसाठी त्यांनी पहिली शॅार्ट फिल्म केली. बाई नावाच्या फिल्म मधून त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला होता. या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये दोघी हा सिनेमा दिग्दर्शित केला. वास्तुपुरुष, घो मला असा हवा, हा भारत माझा, संहिता असे अनेक सिनेमे दिग्दर्शित केले होते.

लेखिक-दिग्दर्शिका-सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भावे यांचं आज सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात निधन झालं.गेले दोन महिने त्या फुफ्फुसांच्या विकाराने त्रस्त होत्या. सध्याची कोविडची परिस्थिती बघता व एरवीही अशा प्रसंगी गर्दी असू नये हे सुमित्रा भावे यांचं मत लक्षात घेता, थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

- चिन्मय दामले

 

टॅग्स :Sumitra Bhaveसुमित्रा भावे