शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश

By नम्रता फडणीस | Updated: October 6, 2023 18:30 IST

दंड रकमेचा भरणा न केल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे....

पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाला एकूण रक्कमेच्या दुप्पट तब्बल 3 कोटी 2 लाख 77 हजार 700 रुपयांचा दंड व त्यावर दरमहा 9 टक्के व्याज द्यावे असा आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनाजी जयसिंग पाटील यांनी दिला आहे. तसेच दंड रकमेचा भरणा न केल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

निगोशिएबल इन्स्टूमेंट ऍक्ट च्या कलम 138 अन्वये विजय खाडे यांनी जयहिंद पाँलिमर प्रा.लि व इतर यांच्याविरुद्ध एक कोटी 51 लाख 38 हजार 850 रुपये रकमेचा धनादेश न वटल्याने लष्कर न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. फिर्यादी खाडे यांनी जयहिंद पाँलिमर प्रा.लि जुन्नर तालुका औद्योगिक, सहकारी वसाहत येथील कंपनी चालविण्याकरिता घेतली होती. कंपनीचे खाते हे फिर्यादी बघत होते. राज्यातील जिल्हा परिषदांना पीव्हीसी पाईप बनवून तो विकण्याचा व्यवसाय कंपनी करीत होती. एक वर्ष कंपनीने पाईप पुरवठा केल्यानंतर फिर्यादींनी कंपनीचे कामकाज करण्याचे थांबविले होते. बँकेचे सर्व व्यवहार परत कंपनी व त्यांचे संचालक पाहू लागले.

त्यामुळे मागील वर्षी जो काही व्यवहार कंपनीने परस्पर जिल्हा परिषदांकडून उचलले होते. फिर्यादी यांना धनादेश रक्कम येणे बाकी असल्याचे कंपनीस कळविले असता कंपनीने त्यांना धनादेश दिला होता. तो धनादेश फिर्यादींनी बँकेत भरला असता न वटता परत आला होता. तेव्हा फिर्यादी यांनी लष्कर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलांनी दाखल केलेले साक्षीपुरावे व लेखी युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायालयाने कंपनीचे संचालक देवीचंद भरत तांबे यांना फिर्यादीला दंडाची रक्कम देण्याचा आदेश दिला.

फिर्यादीच्या बाजूने ऍड विजयकुमार ढाकणे, ऍड राणी विजयकुमार ढाकणे व त्यांचे सहकारी ऍड सिद्धार्थ जाधव व ऍड सारिका पोटभरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय