शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्वाचा सन्मान गरजेचा

By admin | Updated: January 9, 2017 02:48 IST

विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले

पिंपरी : विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. महात्मापणाला शोभेल असे कर्तृत्व भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी रुजविले. सावित्रीबाईंना इतिहासाने महात्मा पदवी दिली नाही. तथापि, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तरी त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना महात्मा म्हणून त्यांना वंदन केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी येथे केले. महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी आमदार दीप्ती चौधरी, कलाकार प्रज्ञा पाटील व्यासपीठावर होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे माहात्म्यपण सर्वार्थाने पेलून नेणाऱ्या सावित्रीबाईंचे योगदानही समजून घेण्याची गरज आहे. बहुजनांना शिक्षणाची दारे बंद झालेल्या कालखंडात फुले यांनी शाळा काढल्या. पण, सावित्रीबाईंनी या शाळा चालविल्या. दलितांना शिक्षणाचे धडे दिले. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण समाजाने शिक्षण नाकारलेल्या ब्राह्मणांच्या मुलींनाही ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या घरातूनही त्यांना विरोध झाला. पण, हा विरोध पत्करून त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. ती आद्यशिक्षिका, लोकशिक्षिका आहे. समाजप्रबोधन करून सत्याच्या अटीमध्ये सबंध माणुसकीचा गहिवर पेरणारी ती माऊली आहे.’’‘‘आजचा महाराष्ट्र आपल्याला जातिमुक्त करायचा असेल, धार्मिक ऐक्य घडवून आर्थिकदृष्ट्याही संपन्न करायचा असेल, मानवतावादाची आपल्याला पुन्हा पेरणी करायची असेल, तर समाजात आग लावणाऱ्या जाती-धर्माचे भांडणे लावणाऱ्या सर्व प्रवृत्ती आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील. तरच आपण महात्मा आणि सावित्रीबाईंचे वारस ठरू शकू,’’ असेही ते म्हणाले. मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा चव्हाण, दत्तात्रेय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महादेव भुजबळ यांनी आभार मानले. विश्वास राऊत, नितीन ताजणे, अनिल साळुंखे, शंकर जाठे, जतिन क्षीरसागर, वैजनाथ माळी, राजेंद्र बरके, श्रीहरी हराळे, विजय देडगे, नरहरी शेवते यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)