शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाचे शट डाऊन, ‘स्मार्ट’ शाळा संगणक लॅब बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:41 IST

तब्बल १,६८६ संगणक बंद अवस्थेत : एकही संगणक शिक्षक नाही, तरीही निधीचा घाट

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कारभारामुळे ‘स्मार्ट’ पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सर्व संगणक लॅब सध्या धूळ खात पडून आहेत. विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या लॅबमधील तब्बल १,६८६ संगणक बंद पडले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांप्रमाणे संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत संगणक लॅब सुरू करण्यात आल्या. यासाठी राज्य शासनाकडून संगणक शिक्षकांची ४८ पदे मजूरदेखील करून घेतली. शहरात महापालिकेच्या २७९ शाळा असून, प्रत्येक इमारतीमध्ये एक संगणक लॅब सुरू करण्यात आली. शहरामध्ये एकूण १२६ संगणक लॅब सुरू करण्यात आल्या. यात एका लॅबमध्ये सरासरी २० ते २५ संगणक बसविण्यात आले. एक लॅब सुरू करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.परंतु, गेल्या दोन वर्षांपासून संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या शाळांमधील संगणक लॅब धूळ खात पडून आहेत. यामध्ये १२६ पैकी ८५ संगणक लॅब सुरू असल्याचे प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले असेल, तरी प्रत्यक्षात एकही संगणक सध्या सुरू नाही.वॉर्डस्तरीय निधीतूनही संगणकखरेदीचा आग्रहमहापालिकेच्या वतीने सर्व शाळांसाठी संगणक लॅबअतंर्गत प्रत्येकी २० ते २५ संगणक खरेदी करण्यात आले. लॅबमधील हे सर्व संगणक शिक्षक नसल्याने गेल्या काही वर्षांपासून बंद पडले आहेत. त्यात आता पुन्हा ई-लर्निंग प्रणालीअतंर्गत मोठ्या प्रमाणात सर्व शाळांसाठी संगणक व डिजिटल बोर्ड खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापूर्वीच सध्या काही नगरसेवकांनी आपल्या वॉर्डस्तरीय निधीतूनदेखील संगणकखरेदी केली असून, हे संगणक धुुळीत पडलेल्या संगणक लॅबमध्येच आणूण टाकण्यात आले आहेत.नव्याने २१ कोटी खर्चून ई-लर्निंगचा घाट1 संगणक लॅबचा कोट्यवधी रुपयांचा खर्च धुळीस मिळाला असताना प्रशासनकडून पुन्हा नव्याने ई-लर्निंगच्या नावाखाली तब्बल २१ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे.2या ई-लर्निंगसाठी महापालिकेने मंजुरी दिली असून, लवकरच बंद पडलेल्या संगणक लॅबमध्येच या नव्याने ‘ई-लर्निंग प्रणाली आणि व्हर्च्युअल क्लासरूम’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले साहित्यदेखील शाळांमध्ये येऊन पडले आहे.

टॅग्स :Puneपुणेdigitalडिजिटल