शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

विद्यार्थी अनुभवणार आता डिजिटल क्लासरूम

By admin | Updated: July 2, 2017 01:59 IST

जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत. जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या हस्ते या डिजिटल क्लासरूमचे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगवी : येथील जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत. जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या हस्ते या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.तावरे म्हणाल्या, ‘‘डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यात शासकीय अनुदानातून एकूण ४ प्राथमिक शाळांना डिजिटल क्लासरूमचे साहित्य मिळाले आहे. त्यामध्ये सांगवीच्या प्राथमिक शाळेला एकूण ३ डिजिटल रूमचे साहित्य मिळाले आहे. तसेच, या वेळी मोबाईल टॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम असेल. मोमीन अल्ताफ यांनी याबाबत माहिती दिली. मोबाईल टॅब आणि डिजिटल क्लासमुळे सर्व चित्ररूपी माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. आधुनिक काळानुसार ज्ञानरूपी प्रगतीच्या वाटेने सर्व विद्यार्थी घडणार आहेत. ९ जानेवारी २०१७च्या जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शासन परिपत्रकानुसार डिजिटल प्रत्येकी एक वर्ग निर्मितीसाठी प्रत्येक वर्गाकरिता २८,६२७ रुपयांच्या मर्यादेखाली साहित्य उपलब्ध होईल. डिजिटल क्लासरूममुळे आता इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने माराठी शाळाही प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहेत. सर्वसामान्य लोकांची मुले मराठी शाळेत शिकत असतात. मराठी शाळेत मुलांना पाठविणे आत्ताच्या काळात कमी लेखले जाते. परंतु, मराठी शाळेतील डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तसेच, मुलांनाही त्याची गोडी निर्माण होईल. यामुळे आता पालकवर्गाचा कल मराठी शाळेकडे निश्चित होईल. यामुळे या डिजिटल क्लासरूमचे सर्वांनी स्वागत केले.या वेळी सरपंच सीमा तावरे, उपसरपंच भानुदास जगताप, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तावरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट तावरे, मुख्याध्यापक संजय गायकवाड, शिक्षक नारायण मोहिते, मोमीन अल्ताफ, बाळासाहेब जगताप, धनश्री तावरे, आशा जगताप, रंजना पवार, मनीषा तावरे, सतीश धुमाळ, शिक्षक शैला हेंद्रे, पूजा शेटे, अश्विनी साळुंखे, नीलिमा माळवदे,जयश्री दगडे, रतन बामणे, चंद्रकांत भोसले, शिवाजी इंगळे, सुरेश राजगुरू आदी शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी उपस्थित होते.