शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ''चा नारायणपूरात जयघोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:32 IST

श्री. क्षेत्र नारायणपुर (ता.पुरंदर ) येथील प्रसिध्द  दत्त मंदीरात आज गुरूपौर्णिमेनिमित्त फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती.

पुणे : श्री. क्षेत्र नारायणपुर (ता.पुरंदर ) येथील प्रसिध्द  दत्त मंदीरात आज गुरूपौर्णिमेनिमित्त फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. विद्यूत रोषणाई ने अवघा परिसर लखलखून निघाला होता.यावेळी भाविकांमधून चार कोपऱ्यातून चार भाविकांना पादुका पूजनाचा मान मिळाला.गुरूपौर्णिमेनिमित्ताने आयोजित  केलेल्या कार्यक्रमांसाठी  उपस्थित राहण्याकरिता पहाटे पासून महाराष्ट्रातून  मध्यप्रदेश, तामीळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातुन आलेले हजारो भाविक उपस्थितीत होते.

नारायण महाराज यांच्या ऊपस्थितीत बाबासाहेब पुरंदरे  यांच्या  हस्ते गुरु व्यास महर्षी यांच्या पादुकांचे पुजन करण्यांत आले. गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यांत आली. पहाटे ४ ते ६ या काळात पादुका व मुर्तींना रुद्राभिषेक करण्यांत आला. त्यानंतर ८.३० ते ९ आरती,९.३० ते ११:३० होमहवन, दुपारी१२ ते १  गुरूपुजन,  दुपारी१ते  १: ३०  बोधामृत, आशिर्वाद, प्रवचन . त्यानंतर १.३० ते २  महाआरती,  दुपारी २ ते ४ महाप्रसाद सायंकाळी ५ ते ७ गुरूपुजन शिष्यांसाठी  नारायण महाराज यांचे शिष्य यांच्या वतीने नारायण महाराज यांचे गुरु पुजन व दर्शन सोहळा पार पडला. रात्रौ ९.३० ते १० वाजता महाआरती झाली.१०ते १२.३० पालखी प्रदक्षिणा व आरती ,  रात्री १.३० ते ४.३० ग्रहणाचे होमहवन पहाटे ५.३० ला पुर्णाहुतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी पंढरपूर देवस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पागे, माजी आमदार ऊल्हास पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, बाळासाहेब सोळस्कर, रामभाऊ बोरकर, भरतनाना क्षीरसागर  उपस्थित होते.  भाविकांनी '' दिगंबरा दिगंबरा '' च्या जयघोष केला. या जयघोषाने हा परिसर दुमदुमला. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाNarayanpurनारायणपूर