शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सोनेबाजाराला हिऱ्याची चमक, रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 03:00 IST

नत्रयोदशीचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याबरोबरच हिºयाच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केली.

पुणे  - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याबरोबरच हिºयाच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतितोळा अडीच ते तीन हजार रुपयांची वाढ होऊनही सराफ बाजारात सोमवारी (दि. ५) रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. सोन्याबरोबरच हिºयांच्या दागिन्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिकांनी नोंदविले. त्यामुळे सोनेरी बाजाराला हिºयांची चमक प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत होते.शहरातील सराफ बाजार सोमवारी बंद असतो. मात्र, मुहूर्तावर सोनेखरेदी करण्याची प्रथा लक्षात घेऊन लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सराफ बाजार सुरू ठेवण्यात आला होता. सकाळी सात वाजता सुरू झालेली बाजारातील वर्दळ रात्री उशिरापर्यंत होती. सोमवारी चोख सोन्याचा भाव (२४ कॅरेट) ३२ हजार ५०० ते ३२ हजार ६०० इतका होता. तर, चांदीचा प्रतिकिलो दर ३९ हजार ३०० रुपयांदरम्यान होता. पूजेसाठी चांदीची लक्ष्मी आणि कुबेराच्या मूर्तीला चांगली मागणी होती. तसेच चांदीची लक्ष्मी प्रतिमा असलेले नाणे खरेदीसाठी नागरिक पसंती देत होते. अगदी ५० ग्रॅमपासून १० किलोपर्यंतच्या लक्ष्मी आणि कुबेरमूर्ती खरेदीसाठी उपलब्ध होत्या.याशिवाय सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, टेम्पल आणि भरजरी दागिन्यांना चांगली मागणी आहे. सोन्याबरोबरच हिºयांचे दागिने खरेदी करण्याकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. कमी वजनाच्या हिºयाच्या वस्तूंना अधिक पसंती होती. त्यात १५ हजार रुपये किमतीच्या अंगठीपासून एक लाख रुपयांपर्यंतचे दागिने, बांगड्या, कानातील डूल याला मागणी आहे. याशिवाय मंगळसूत्राच्या वाट्यादेखील हिºयाच्या घेण्याकडे खरेदीदारांचा कल दिसून येत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या दिवाळीमध्ये सोन्याचा प्रतितोळा भाव २९ हजार ६०० रुपये होता. त्यात अडीच ते तीन हजार रुपयांदरम्यान वाढ झाली आहे, असे असूनही सोनेखरेदीत वाढ झाली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Diwaliदिवाळी