शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भोर-कापूरव्होळ मार्ग निसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:09 IST

रस्ता निसरडा झाल्याने शुक्रवारी जवळपास ७ ते ८ दुचाकी अपघातग्रस्त

भोर : भोर-कापूरव्होळ मार्गावर ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी शासनाकडून आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्यांच्या साईडपट्ट्या उकरून माती रस्त्यावर टाकण्यात आली होती. हे खड्डे बुजविल्यानंतर माती रस्त्यावरच राहिली असून पावसाच्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने शुक्रवारी जवळपास ७ ते ८ दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाले. काही ठिकाणी तोडलेली झाडे रस्त्यावरच टाकण्यात आली आहेत. तर, रस्त्याच्या बाजूंची गटारेही खराब झाल्यामुळे खोदण्यात आलेल्या चारीत गाड्या अडकून पडल्या आहेत. कामाची मुदत गेल्या वर्षी पावसाळ्यात संपली असून दुसरा पावसाळा सुरू होऊन काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.२०१७ पासून भोर तालुक्यातील ग्रामपंचायती डिजीटल करण्यासाठी भारत दूरसंचार निगम लिमिटेड (टेलिफोन)मार्फत काम सुरू आहे. यामुळे ग्रामंचायतीत वीजबिल, विविध प्रकारचे दाखले, फोन बिल व ग्रामपंचायती अद्ययावत होणार आहेत. या कामासाठी रस्त्याशेजारील जमिनीत सुमारे ५ फूट खोल खड्डा खणून त्यात पाईप व नंतर आॅप्टिकल वायर टाकली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी फक्त पाईपच गाडला असून वायर टाकण्यासाठी अर्धा किलोमीटरवर खड्डे ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मातीमुळे साईटपट्ट्या व गटारे बुजली आहेत. काही ठिकाणी मार्गात येणारी झाडे तोडलेली असून खड्डे चांगल्या पद्धतीने बजुवले जात नाहीत. जमिनीत खड्डा काढताना तो पाच फूट काढला जात नसून मागील वर्षापासून हे काम रेंगाळले आहे. सन २०१७ पर्यंतच हे काम पूर्ण करण्याची मुदत होती; मात्र मागचा पावसाळा संपून दुसरा पावसाळा आला तरी ही कामे प्रलंबित आहेत. .

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा