शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

ढोल-ताशा पथकांना ‘सामाजिक बांधिलकी’चा नाद

By admin | Updated: July 8, 2017 02:37 IST

सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे पथकांमध्ये सामावलेली संघटनेची मोठी ताकद आहे. या पथकांच्या एका छताखाली ही सर्व तरुणाई आपल्या छंदात रममाण होते. पण या काही महिन्यांच्या सराव कालखंडानंतर वा उत्सवानंतर ही सर्व मंडळी कधी एकत्र येतात का? असा सहज प्रश्न मनाला भिडतो आणि पावले जेव्हा याचे उत्तर शोधण्यासाठी या पथकांकडे वळतात आणि त्यातून समोर येते ढोलताशा पथकांच्या सामाजिक बांधिलकीच्या मोहिमेतले अभूतपूर्व योगदान. दिवसेंदिवस समाजातील माणुसकी संपत चालल्याचे प्रसंग समोर घडत असताना आणि प्रत्येकामधील वाढत्या आत्मकेंद्री स्वभावाच्या पार्श्वभूमीवर हे ढोलपथकांच्याद्वारे उभे राहिलेले सामाजिक कार्याचे चित्र समाजाला आदर्शदायी व सुखावह आहे. या ढोलपथकाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न व मनुष्यबळ यांचा संयोग घडवत ही ढोलपथके अनेक सामाजिक उपक्रम खेडेगावात, वाड्यावस्त्यांवर, तसेच शहरातील झोपडपट्टी, दुर्लक्षित भागात सक्रियतेने करताना दिसतात. काही मित्रांनी फेसबुकवर त्यांच्या ढोलपथकांनी केलेले रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या ढोलपथकांवर सरावाच्या दरम्यान जी काही अन्यायकारक कारवाई केली जाते, त्याला हे कार्य चपखल उत्तर आहे. ही तरुणाई एरवी पेन वा छोटीशी आपली गोष्टही कुणाला देणार नाही. कुठे दिसो वा नसो; पण या पथकांच्या उपक्रमात हे हमखास सहभागी होताना दिसतात. वेल्ह्याच्या पुढे एका खेडेगावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमच्या रमणबाग व इतर काही पथके मिळून विहीर खोदण्याचे कार्य दोन वर्षांपासून सुरू केले आहे. दुष्काळाच्या वेळी पथकांतर्फे डाळींसह विविध प्रकारचे धान्य त़्या भागात पोहोचविण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपणाने ही मोठी चळवळ राबविली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खूप आनंद या सामाजिक कार्यातून मिळतो.- महेश लिमये, रमणबाग ढोल पथकस्वरुपवर्धिनीद्वारे वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम राबविला जातो. विविध प्रसंगी स्त्रीभ्रूणहत्या, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहशतवाद आदी सामाजिक प्रश्नांवरील पथनाट्येही सादर केली जातात. रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात.- ज्ञानेश पुरंदरे, स्वरुपवर्धिनी पथक