शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आव्वाज कुणाचा? ढोलताशा पथकांचा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 13:36 IST

गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू! ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो...

ठळक मुद्देतरुणाईचा सहभाग मोठा : शहरात ठिकठिकाणी सराव 

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे ताल आणि वादनातील वैविध्यासह ढोलताशा पथके सज्ज झाली आहेत. महिनाभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेला सराव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तालाचा लयबद्ध आविष्कार पुणेकरांना अनुभवता यावा आणि गणेशोत्सव आगळ्या पद्धतीने अनुभवता यावा, यासाठी पथकांची तयारी सुरू आहे.गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू! ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो. हा सोहळा अधिकाधिक देखणा करण्यासाठी ढोलताशा पथकांनी कंबर कसली आहे. शिस्त आणि तालबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळांची कायम ढोलताशा पथकांना पसंती असते. डीजेच्या दणदणाटात ढोलताशाचे लयबद्ध नादमाधुर्य सुखावह वाटते. गणरायाच्या आगमनासाठी ढोलताशा पथके गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तयारीला लागली आहेत. नदीपात्र, म्हात्रे पूल, विविध शाळांची मैदाने अशा विविध ठिकाणांहून सध्या ढोलताशांचा आवाज नागरिकांच्या कानावर पडत आहे.ढोलताशा पथकात माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यवसायात कार्यरत असणारे युवकदेखील उत्साहाने सामील होत आहेत. तीन-चार वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे. स्वत:च्या परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात सहभागी होण्याची ओढ असल्याकारणाने ही मंडळी पथकांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे शहरातील पथकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.  पुण्यात गणेशोत्सव काळात पथकांना साधारणपणे २ ते १० लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते. दहा दिवसांच्या काळात साधारणपणे १० कोटींची उलाढाल होते. ढोलताशा महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ढोलताशा पथकांची बैठकही नुकतीच पार पडली. पोलीस प्रशासनाबरोबरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. पोलिसांनी तयार केलेल्या आचारसंहितेनुसार नियमावली तयार करण्यात आली आहे. या वेळी पोलिसांनी पथकांकडून सर्व वादकांची संगणकीकृत माहिती मागवली असून, पोलिसांकडून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत.ब्रह्मचैतन्य पथकातर्फे यंदा दोन नवीन ताल वादनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. दीड-दोन मिनिटांचे हे बफर ताल असून, बरची नृत्याचाही समावेश असेल. पुण्यातील गणेशोत्सव पार पडल्यानंतर हे पथक वादनासाठी हैदराबादला रवाना होते. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव