शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धायरीकरांना मिळणार उड्डाणपुलाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:25 IST

धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे.

ठळक मुद्देशहर सुधारणाचा प्रयत्न :  छोट्या उड्डाणपुलाचा प्रस्तावप्रशासनाची २०० मीटर अंतराचा वाय आकाराचा पूल उभारण्यात यावा अशी अभ्यासपूर्ण माहिती

पुणे : सिंहगड रस्त्यावर सणस शाळेजवळ धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने खडकवासला रस्त्याकडे जाणारा उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, त्यामुळे पुलाखालच्या चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढली. त्यामुळे आता या उड्डाणपुलावरून इंग्रजी वाय आकारात धायरीकडे जाणारा एक छोटा उड्डाणपूल बांधण्याच्या विचारात महापालिका आहे.धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही परिसरात मागील काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे. त्यामुळे धायरीकडून येणाऱ्या वाहनांची पुलाखालील चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. ती कमी व्हावी म्हणून आता या नव्या उड्डापुलाचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यावर समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुशिल मेंगडे व उपाध्यक्ष अजय खेडेकर यांनी दिली. समितीच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीकडे विचारार्थ म्हणून पाठवण्यात येईल. स्थानिक नगरसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे दिला होती. त्यावर समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता. प्रशासनाने संबधित ठिकाणाचा तसेच वाहतूकीचा अभ्यास करून अभिप्राय दिला आहे. सणस शाळेकडून धायरीकडे जाणारा रस्ता विकास आराखड्यात २४ मीटर रूंदीचा आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक व्यावसायिक तसेच विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता फक्त १६ मीटर शिल्लक राहिला आहे. खरी वाहतूक कोंडी त्यामुळे होत आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या असलेल्या उड्डाणपुलावरूनच वाय आकारात धायरीकडे जाणारा २०० मीटर अंतराचा उड्डाणपूल बांधल्यास बाहेर जाणारी वाहने त्यावरून जाऊ शकतात असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. 

टॅग्स :DhayariधायरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी