शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मराठा समाजाकडून राज्यात आज धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुणे जिल्हा शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुणे जिल्हा शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांच्या वतीने २ सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एकूण १७ मागण्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला देणार आहोत, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी दिली.

शिवसंग्रामचे प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, युवकाध्यक्ष नितीन ननावरे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, कल्याणराव अडागळे या वेळी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी सार्वत्रिक भावना आहे. याला जबाबदार राज्य मंत्रिमंडळाच्या मराठाविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेच असल्याने त्यांची तातडीने उपसमितीवरून हकालपट्टी करावी, ही प्रमुख मागणी या धरणे आंदोलनात करणार असल्याचे तुषार काकडे यांनी सांगितले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

----

मागासवर्ग आयोगावरील सर्व सदस्य ‘मराठाविरोधी’

नुकताच गठीत झालेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर सर्वच्या सर्व सदस्य हे ‘मराठाविरोधी’ असल्याचा आरोप तुषार काकडे यांनी केला आहे. तसेच हा आयोग त्वरित बरखास्त करून नवीन समतोल सदस्यांना घेऊन पुनर्गठन करावे, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.