एकूणच वीकेंड लॉकडाउच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कात्रज मुख्य चौक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय व दत्तनगर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे.
त्याचबरोबर धनकवडी सहकारनगर भागातसुद्धा सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून सातारा रस्ता अहिल्यादेवी चौक, ट्रेझर पार्क व शिंदे हायस्कूल परिसरात बॅरिकेड्स लावून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर १८८ अंतर्गत कारवाई केली जात आहे. एकंदरीत दोन्हीही ठिकाणी नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना बाहेर फिरण्यास अटकाव केला जात आहे.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच रिक्षा प्रवास सुरू आहे. परंतू संचारबंदीमुळे लोक घरातच लॉकडाउन असल्याने या सुरु असलेल्या सेवांना ही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र उपनगरांमधील विविध भागात दिसून येत आहे.
फोटो ओळ -एरवी नेहमी गजबजलेला सद्गुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूल निर्मनुष्य दिसत होता. संपूर्ण सातारा रस्ता परिसरात शुकशुकाट पसरला होता.