शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर धनगर समाजाचे 'ढोल बजाव' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 18:44 IST

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते असल्यामुळे पवार यांनी आरक्षणप्रश्नी लक्ष घालून तोडगा काढावा..

ठळक मुद्देअन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल...

बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न कायम आहे.या समाजाने देखील हा प्रश्न वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीदेखील पदरी फक्त आश्वासने आणि निराशाच आली आहे. त्यामुळे धनगर समाज अस्वस्थ असून हे आंदोलन करण्यात येत आहेत. सरकारने धनगर समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा यांसह विविध मागण्यांसाठी 'ढोल बजाव' आंदोलन करण्यात आले.  

बारामती तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानासमोर शुक्रवारी (दि.२५ सप्टें) 'ढोल बजाव' आंदोलन करण्यात आले.

फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी मंजूर केलेले १००० कोटी रुपये धनगर समाजाच्या विकासासाठी खर्च करावेत,समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करून ST प्रवर्गाला लागू असणाऱ्या सर्व सुविधा धनगर समाजाला लागू कराव्यात व धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. याचबरोबर महाराष्ट्रभर मेंढपाळांवर हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मेंढपाळांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी सरकारने घटनात्मक बदल करून कायदा लागू करावा व मेंढपाळांना संरक्षण द्यावे. आदी मागण्यांसाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,जगदीश कोळेकर, गोविंद देवकाते, सुधाकर पांढरे,अजित मासाळ,भारत देवकाते,गणेश कचरे,समीर झारगड ,गणेश कोकरे ,नितीन शेळके आदी समाजबांधव उपस्थित होते.                        .................शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते असल्यामुळे पवार यांनी आरक्षण प्रश्नी लक्ष घालून तोडगा काढावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.-पांडुरंग कचरे,भाजप बारामती तालुकाध्यक्ष

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारDhangar Reservationधनगर आरक्षणState Governmentराज्य सरकार