शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपी’वरून राष्ट्रवादीत धुमशान

By admin | Updated: February 22, 2015 00:28 IST

एफएसआयवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण व सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत पुन्हा वाद झाला.

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) शहरासाठी निर्धारित करण्यात आलेल्या तीन एफएसआयवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण व सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत पुन्हा वाद झाला. आराखडा वेळेत मान्य करण्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे; तर नगरसेवकांना चर्चेसाठी एका महिन्याचा कालावधी मिळावा, अशी शहाराध्यक्षांची मागणी आहे. या मागणीसाठी येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डीपीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्याचा निर्णय नगरसेवकांच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. डीपीवर नोंदविण्यात आलेल्या हरकती-सूचनांवरील नियोजन समितीचा अहवाल शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सादर केला गेला. शिफारसींवरून समितीमध्येही दोन तट पडल्याने तब्बल चार अहवाल सभेसमोर सादर करण्यात आले आहेत. नियोजन समितीने मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूस वाढीव एफएसआय देण्याऐवजी सरसकट सर्व शहरामध्ये तीन एफएसआय लागू केला जावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. सभागृहनेते सुभाष जगताप यांनीही शहराच्या भविष्यातील विकासासाठी वाढील एफएसआय आवश्यक असल्याचे जोरदार समर्थन केले.मुंबईत आठ एफएसआय आहे; मग पुण्यात तीन का नको, अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, अ‍ॅड. चव्हाण यांनी सरसकट एफएसआयमध्ये वाढ करण्यास विरोध दर्शविला. त्याबाबतची सविस्तर कारणमीमांसाही त्यांनी विशद केली. तरीही, सभागृहनेते तीन एफएसआयवर ठाम होते. या दोघांमध्ये वाढीव एफएसआयच्या चांगलाच वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)आराखडा शासनाने ताब्यात घ्यावा विकास आराखड्याबाबत भूमिका ठरविण्यासाठी भाजपचीही शनिवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत पक्षाचा विकास आराखड्याला विरोध नसल्याचे स्पष्ट करीत डीपीमध्ये बदलण्यात आलेली आरक्षणे तसेच चुका दुरूस्त करण्यासाठी राज्यशासनाने विकास आराखडा ताब्यात घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी सांगितले. शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते.