शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या देवकाबाई वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

देवकाबाई वाघमारे यांच्या रूपाने शिवसेनेची मुळशी तालुक्यातील पहिली आदिवासी महिला सरपंच ही शिवसेनेला मिळालेली असून कोळावडे ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा ...

देवकाबाई वाघमारे यांच्या रूपाने शिवसेनेची मुळशी तालुक्यातील पहिली आदिवासी महिला सरपंच ही शिवसेनेला मिळालेली असून कोळावडे ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा आपला भगवा फडकविला आहे.

बारामती लोकसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या मार्गदर्शनाखाली देवकाबाई वाघमारे यांची निवड शिवसेनेकडून करण्यात आली आहे

कोळवडे ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा सदस्य असून सरपंच पदासाठी देवकाबाई वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कोळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदासाठी जनार्दन उभे व वसंत उभे या दोघांचे अर्ज आले होते. त्यावेळी जनार्दन उभे यांनी वसंत उभे यांचा ४-२ असा मताच्या फरकाने पराभव केल्याने कोळवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र भालेराव व ग्रामसेविका खुडे यांनी काम पाहिले.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, जि. प. सदस्य सागर काटकर, प्रकाश भेगडे, जिल्हा संघटिका महिला आघाडी संगीता पवळे, शिवसेना समन्वयक भोर-वेल्हा-मुळशी कैलास मारणे,उपतालुकाप्रमुख शिवाजी उभे, नागेश साखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे, युवानेते अमित कुडले, सुरेश मारणे, देविदास उभे, सोमनाथ उभे, अनिल उभे, किसन लेकावळे, सुनील उभे, समीर शिंदे, राजेंद्र मारणे, रमेश मोगल उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १० पिरंगुट कोळवाडी ग्रामपंचायत वाघमारे

फोटो ओळ : कोळावडे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.