शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही; पवार यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:46 IST

पुण्यात पत्रकारांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का, याबाबत विचारले असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. शरद पवार यांचा खोचक टोला

पुणे : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं, असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर सुरुवातीला शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं; पण आज त्यांनी यावर भाष्य केलं असून, ‘पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे, की इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन फडणवीस यांच महत्त्व वाढवायचं नाही,’ असे पवार यांनी म्हटले आहे. 

पुण्यात पत्रकारांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का, याबाबत विचारले असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका, असे सांगितले. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी (कसबा आणि चिंचवड) जावं लागेल, असे  ते  म्हणाले. 

गिरीष बापट यांच्या यातना वाढू नये, हीच अपेक्षाखासदार गिरीष बापट हे आजारी असतानाही भाजपने त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्याने भाजपवर चौफेर टीका होत आहे. यावरही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्यांना प्रचारात आणणे ही भाजपची गरज होती का हे ठाऊक नाही; पण मी गिरीष बापट यांना भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता, त्यांच्या यातना वाढू नये, हीच अपेक्षा आहे.

ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेलीआसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावरून त्यांनी आसाम सरकारवर टीका केली. १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. असे असतानाही ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याविषयी काय सांगायचं..? असे शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस