शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ४२ अ‍ॅमिनिटी स्पेसचा स्मार्ट सिटीकडून विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 02:04 IST

स्मार्ट सिटी एरियातील बाणेर-औंध - बालेवाडी भागातील ४२ अ‍ॅमिनिटी स्पेस विकासासाठी स्मार्ट सिटीने मागितल्या आहेत.

पुणे : स्मार्ट सिटीच्या बाणेर-औंध-बालेवाडी या भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४२ अ‍ॅमिनिटी स्पेस या कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. दरमहा एक रुपये नाममात्र भाडे दराने या जागा देण्यात येणार आहे. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर स्मार्ट सिटीने या जागा विनाअट महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या ठरावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली.

स्मार्ट सिटी एरियातील बाणेर-औंध - बालेवाडी भागातील ४२ अ‍ॅमिनिटी स्पेस विकासासाठी स्मार्ट सिटीने मागितल्या आहेत. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या संयुक्त प्रकल्प म्हणून दरमहा एक रुपये भाडे आकारले जाणार आहे. या जागा विकसित करण्याचा खर्च स्मार्ट सिटीने करायचा आहे. या प्रकल्पाचा लाभ नागरिकांना मोफत किंवा वाजवी शुल्क आकरण्याचा अधिकार पालिका आयुक्ताना असणार आहे. पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च स्मार्ट सिटीने करायचा आहे. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर स्मार्ट सिटीने संबंधित विकसित जागेचा विनाअट ताबा महापालिकेला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली.स्मार्ट सिटी एरियामधील जागा बरोबर बालेवाडी स. नं. ३५ आरक्षित जागा स्मार्ट सिटीअंतर्गत उद्यान विकसित करणे. कर्वेनगर येथील अस्तित्वात असलेले, पालिकेच्या ताब्यातील प्ले ग्राउंड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करणे. प्रभाग क्र. २८ क घोरपडी पेठ येथील श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान अर्धवट असलेले कामे करणे. खराडी क्षेत्र समोरील ताब्यात असलेले प्ले ग्राउंड विकसित करावे. सैदराबाई शाशेजारील ७ एकरमधील गार्डन स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करावे. प्रभाग ३८ मधील कात्रज राजस सोसायटीतील मोरया उद्यान व कात्रज स. नं. ४८ येथील उद्यान आरक्षणाची जागा विकसित करण्याचीही उपसूचनाही मंजूर करण्यात आली आहे, असेही सुशील मेगंडे यांनी सांगितले.ग. दि. माडगुळकर स्मारक उभारणारकोथरुड येथील स. नं. ६९, ७० येथील एक्झिबिशन ग्राऊंड येथील आरक्षित जागेवरील नियोजित इमारतीमध्ये ग. दि. माडगुळकर स्मारक उभारण्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.- सुशील मेंगडे, अध्यक्ष शहर सुधारणा समिती

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका