शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण; पाच वर्षांत चौघांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 16:21 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो.

प्रशांत ननवरे -बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र,याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलुन गेले आहेत. आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या पाच वर्षात ७ ऑगस्ट २०१५ पासून निलेश देखमुख,मंगेश चितळे,योगेश कडुसकर,किरणराज यादव  हे ४ मुख्याधिकारी बदलुन गेले आहेत.आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे.या पार्श्वभुमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो याचे संशोधन होण्याची गरज आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची,दर्जाची पाहणी करत आहेत. मात्र,सातत्याने बदलुन जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे पवारांच्या शहर विकासनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. नगरपरिषदेची व्हेंटिलेटरवर असणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सक्षम मुख्याधिकाऱ्याचीच गरज आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांची २१ जून २०२१ रोजी मुंबई येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, ५० दिवस उलटून देखील बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळालेले नाही. सध्या अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांच्या नावाची नवीन मुख्याधिकारी पदासाठी चर्चा आहे.

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षाचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, जे कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारTransferबदली