शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैसा बदलणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट

By admin | Updated: November 17, 2016 03:54 IST

केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या नोटांच्या रूपातील काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.

येरवडा : केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या नोटांच्या रूपातील काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. अगदी दोन-अडीच लाखांपासून ते कोटीतील रकमा बदलून देण्याची तयारी हे एजंट दाखवत आहेत. या संधीचा फायदा घेऊन अनेक काळ्या पैशावाल्यांनी आपले उखळ पांढरे केल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावालांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता आपले कसे होणार, या चिंतेत असतानाच बाजारात नोटा बदलून त्याबदल्यात सोने अथवा १०० रुपायांखालील चलन देणाऱ्या एजंट निर्माण झाल्याने काळ्या पैसेवाल्यांना काळे धन लपवण्याचा मार्ग पुन्हा सापडत आहे. पाचशे व हजारांच्या बदल्यात सोने घेतल्यास त्याचा भाव सुमारे ५१ हजार रुपये प्रतितोळा सांगितला जात आहे. तर या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा देताना २० ते ४० टक्के रक्कम कपात केली जात असल्याच्या चर्चा आहेत. अनेक करोडपतींनी त्यांच्याकडील पैसा अशा प्रकारे पांढरा केल्याचेही समजते. तसेच बँकेमध्ये अडीच लाखांपर्यंत रक्कम भरता येणार असल्याने, काहींनी या नियमाचा फायदा घेतला आहे. आपल्या जवळच्या अनेक व्यक्तींच्या खात्यावर अडीच लाख रुपये भरून काळा पैसा पांढरा करण्यात येत आहे. यासाठी काळा पैशावाले कमिशन देण्याचीही तयारी दाखवत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे मात्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेल्या योजनांना हरताळ फासला जात आहे.