शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांनी' लुटला अभ्यंगस्नानाचा शाही आनंद!, दिव्यांचा झगमगाट अन् तेल-उटण्याचा सुवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:17 IST

दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्‍या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देवंचित मुलांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला.हा शाही अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता

पुणे : एक अनोखी पहाट... रांगोळ्यांचा थाट,  मांडलेला पाट आणि दिव्यांचा झगमगाट, तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचं ताट, गोडाचा घास, नव्या कपड्यांचा साज या सार्‍यांचा  अनुभव घेत फुटपाथवर राहणार्‍या वंचित मुलांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला.निमित्त होते दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्‍या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या शाही अभ्यंगस्नानाचे. खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने  पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणार्‍या या मुलांची सोमवारची  सकाळ मात्र आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि  मांडलेले  पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली. आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल आणि समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात हा शाही अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे , फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने यांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर हा सुखद सोहळा पाहणार्‍या 'त्या ' मुलांच्या  पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहावयास मिळत होते.  या उपक्रमात रोटरी क्लब शनिवारवाडा या संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, अभिषेक बागुल, गोरख मरळ, श्याम काळे, सोमनाथ कोंडे, महेश ढवळे, हेमंत बागुल, सागर आरोळे, विक्रम खन्ना, अशोक शिंदे, विजय बिबवे, धनंजय कांबळे, सुरेश कांबळे, योगेश निकाळजे, इम्तियाज तांबोळी, राहुल बागुल, राजाभाऊ पोळ, सुयोग धाडवे, दीपक गोरखा, पंकज गायकवाड हे सहभागी झाले होते. 

टॅग्स :diwaliदिवाळीPuneपुणेIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस