शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेचा बोजवारा

By admin | Updated: May 5, 2017 02:16 IST

शासनाचे धोरण नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा देण्याचे असले, तरी नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी

संतोष म्हस्के / नेरेशासनाचे धोरण नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा देण्याचे असले, तरी नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे सेवेचा बोजवारा उडाला आहे़ दिवसभरात पाच ते सहा तासच दवाखाना उघडा असतो़ या दयनीय अवस्थेमुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.भोर तालुक्याच्या दक्षिणेला वीसगाव खोऱ्यात दुर्गम डोंगरी नेरे गावात हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात सुरुवातीच्या काळात रुग्णांना योग्य सेवा मिळत असे; मात्र काही दिवसांनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केंद्रातील सेवेचा बोजवारा उडाला आहे़ वैद्यकीय अधिकारीच वेळेत हजर नसल्याने कर्मचारी याचा गैरफायदा घेऊन वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ रुग्णांना सेवा वेळेत मिळत नाही़ अनेक वेळा दवाखान्याला कुलूप असल्याने व कर्मचारी हजर नसल्याने महिलांना खासगी आणलेल्या वाहनातच बाळाला जन्म द्यावा लागतो़ तसेच, रुग्णांना आरोग्य केंद्राच्या बाहेरच तासन् तास डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते़ परिणामी, दवाखाना बंद असल्याने आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर रुग्णांना झोपून राहावे लागते़ या आरोग्य केंद्राच्या शेजारून भोर-मांढरदेवी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आसते़ या मार्गावर छोटे-मोठे अपघात होत आसतात. मात्र, अपघातांनतर रुग्णांना उपचारांसाठी शासकीय दवाखान्यात नेले जाते; परंतु दवाखानाच बंद असल्याने गंभीर जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेईपर्यंत आपला जीव गमवावा लागतो़ येथील रुग्णवाहिकेचा तुटलेला दिवा दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे ही रुग्णवाहिका आहे की वडापची गाडी, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण होत आहे़नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे़ याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भगवान पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुदर्शन मालाजुरे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करीत आहेत.समस्यांचा विळखा कायमच-नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे़ येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर राहत नाहीत, याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून यात राजकारण आणले जात आहे, असे उपसरपंच चंद्राकांत सावले यांनी सांगितले़ (वार्ताहर)रिक्त पदे : भरणार आमच्याकडे शिपाई,  आरोग्यसेविका व बहुविध आरोग्यसेवक अशी तीन  पदे रिक्त आहेत. ती लवकरात लवकर भरणार आहोत़ सध्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन व रुग्णांना आरोग्य सेवा वेळेत देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ़ धनंजय राऊत यांनी सांगितले आहे़