शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संतराजमहाराज पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:21 IST

श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पावसाच्या धारा झेलत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता.

केडगाव - श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पावसाच्या धारा झेलत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता. मुळा-मुठा व भीमा नदी यांच्या संगमावरील पुलावर पालखी सोहळा कोंडेवस्तीकडे येताना वारकरी पैलतीरावर बसून डोळ्यांमध्ये साठवत होते. पालखी सोहळ्याचे ५१ वे वर्ष असून, चालूवर्षी या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी सुमारे १० हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. आज सकाळी सोहळ्यानिमित्त संगमेश्वराचा अभिषेक झाला. त्यानंतर संस्थानास ५० लाख रुपये किमतीची १ एकर जमीन देणगी स्वरूपात देणाऱ्या बाळासाहेब किसन थोरात व संजय किसन थोरात यांचा संस्थानच्यावतीने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सन्मान केला.पालखी, पादुका, मानाचा हिरा अश्व, संगमेश्वर यांचे पूजन करण्यात आले. यावर्षी मारुती बोत्रे यांच्या हिरा-तुरा या खिलारी बैलजोडीस पालखीरथ ओढण्याचा मान मिळाला आहे. तसेच माऊली ताकवणे सांभाळ करीत असलेला हिरा अश्व वारीत सहभागी झाला आहे. पालखीरथाची फुलांनी सजावट मच्छिंद्र अडागळे यांनी, दुरुस्ती गजानन झांजे यांनी केली आहे. नगारारथ ओढण्यासाठी महिपती शितोळे यांची बैलगाडी आहे.पावसासाठी साकडेचालूवर्षी पाऊस लांबलेला आहे. त्यामुळे काहीशा चिंतेतच वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यावर्षी लांबलेला पाऊस पडू दे व शेतकरी दुष्काळमुक्त होऊ दे, असे साकडे वारकºयांनी पांडुरंगास प्रस्थानावेळी घातले.सोहळा संगम येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करीत सोहळा न्याहरीसाठी कोंडेवस्तीवर विसावला. कोंडे परिवाराच्यावतीने ५ क्विंटल खिचडीवाटप करण्यात आली. सोहळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर देलवडीकडे मार्गस्थ झाला.देलवडी ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागतकमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले. हा सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी येथे स्थिरावला. या कार्यक्रमासाठी शांतिनाथ महाराज, बबनराव पाचपुते, रमेश थोरात, रंजना कुल, अशोक पवार, पांडुरंग राऊत, प्रदीप कंद, झुंबर गायकवाड, राणी शेळके, वैशाली नागवडे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, वैशाली आबणे, सुशांत दरेकर, सुरेश महाराज साठे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :PuneपुणेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा