शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पुरस्कारांचे अनुदान नाकारले, पं. वसंतराव गाडगीळ यांचा पालिकेला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:08 IST

ॠषिपंचमीच्या मुहूर्तावर शारदा ज्ञानपीठातर्फे दर वर्षी १४ सप्टेंबर रोजी ११ ॠषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो. २०१६मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले.

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : ॠषिपंचमीच्या मुहूर्तावर शारदा ज्ञानपीठातर्फे दर वर्षी १४ सप्टेंबर रोजी ११ ॠषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो. २०१६मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्या संदर्भातील ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरही झाला. मात्र, मुक्ता टिळक महापौरपदी विराजमान झाल्यावर त्या वर्षी ही रक्कम मिळाली नाहीच; या वर्षी पुरस्कार सोहळ्याला ४३ वर्षे पूर्ण होत असताना राज्य सरकारच्या अध्यादेशाचा संदर्भ देत यंदाही अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांच्या अनुदानासाठी या वयात महापालिकेत पायपीट करायची का, असा संतप्त सवाल पं. वसंतराव गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.या पुरस्कार समारंभासाठी २०१६मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहिले होते. सोहळ्यासाठी त्यांनी महापालिकेतर्फे २ लाख रुपयांची रक्कम जाहीर केली. याबाबतचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडून या रकमेच्या तरतुदीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर १५ मार्च २०१७ रोजी मुक्ता टिळक महापौरपदी विराजमान झाल्या. त्या वर्षी झालेल्या कार्यक्रमाला ही मदत मिळू शकली नाही. याबाबत महापौरांकडे विचारणा केली असता त्या समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत.जानेवारी २०१८मध्ये राज्यातील एका महापालिकेच्या संदर्भात न्यायालयाने सांस्कृतिक महोत्सवांवर होणारी उधळपट्टी रोखावी, असा निकाल दिला होता. या निकालाचा संदर्भ देत राज्य सरकारने अध्यादेश काढला. पालिकेला अध्यादेशाचा अर्थच न कळाल्याने महोत्सवांवरील उधळपट्टी रोखण्याऐवजी पुणे महापालिकेने पुरस्कारांची रक्कमच थांबवली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही पुरस्कार सोहळ्यासाठी रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पं. वसंतराव गाडगीळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.‘लोकमत’शी बोलताना पं. गाडगीळ म्हणाले, ‘‘४२ वर्षांपासून महापौरांच्या हस्ते ॠषितुल्यांचा सत्कार केला जातो. आतापर्यंत ४२५ ॠषींचा सत्कार झाला आहे. नानासाहेब गोरे महापौैर असताना संझगिरी शंकराचार्य पुण्यात आले होते. त्या वेळी गोरे यांनी केलेले संस्कृत भाषण ऐकून ते अवाक् झाले. माजी उपमहापौर अली सोमजी, माजी महापौर मोहनसिंग राजपाल या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असताना कार्यक्रम पाहून ते भारावले. सोमजी यांनी ५,००० रुपये, तर राजपाल यांनी २१,००० रुपयांची रक्कम कार्यक्रमासाठी स्वत:हून देऊ केली. प्रशांत जगताप यांनी २०१६मध्ये कार्यक्रमात महापालिकेला सामावून घेण्याच्या उद्देशाने २ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यासाठी मी कोणताही अर्ज केला नव्हता. त्या संदर्भात मंजूर झालेल्या ठरावाची कार्यवाही करण्याची जबाबदारी करण्याची पुढील महापौैरांवर होती. मात्र, त्यांनी मागील वर्षी अनुदान मंजूर केले नाही.>मागील वर्षी काही कारणाने ॠषिपंचमीच्या कार्यक्रमासाठी अनुदान देणे शक्य झाले नाही. जानेवारी महिन्यात न्यायालयाने काढलेल्या आदेशामुळे पुरस्कार, महोत्सवांवरील खर्चाबाबत महापालिकेला पुनर्विचार करावा लागणार आहे. या संदर्भात सर्व माहिती घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.- मुक्ता टिळक, महापौैर>महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये संस्कृती जपली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे ही शहराची शान आहे. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करणे हे महापौैरांचे कर्तव्य आहे. मात्र, पडद्यामागे राहून काम करून शहराच्या वैैभवात भर घालणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या पुरस्कार सोहळ्यासाठी महापौैरांनी विशेषत्वाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे मला वाटते.- प्रशांत जगताप, माजी महापौैर>पुरस्कार सोहळ्याच्या अनुदानासाठी महापालिकेत हेलपाटे घालण्याचे माझे वय नाही. महापौैरांनी स्वत:हून याबाबत निर्णय घेऊन ठराव अमलात आणायला हवा. आजवर सन्मानित करण्यात आलेल्या ॠषींचे सचित्र पुस्तक तयार करण्याचे काम मी हाती घेतले आहे. ४३व्या कार्यक्रमाच्या खर्चाचे नियोजनही करायचे आहे. यामध्ये माजी महापौैर लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे.- पं. वसंतराव गाडगीळ