वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) परिसर तसेच शिवाजीनगर गार्डन भागात डेंग्यूचे 3क् ते 35 रुग्ण आढळले आहेत. मात्र परिसर स्वच्छता, उपाययोजना, अमंलबजावणी करण्याबाबत ग्रामपंचायत डोळेझाक करीत आहे.
याबाबत 3क् ऑक्टोबर्पयत उपाययोजना राबवावी. अन्यथा ग्रामपंचायतीसमोर धरणो आंदोलन तसेच उपोषण करण्याचा इशारा वालचंदनगर आणि इंदापूर तालुका भाजपा शहर उपाध्यक्ष बसवेश्वर पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शहराच्या शिवाजीनगर गार्डन भागात डेंग्युचे सुमारे 3क् ते 35 रूग्ण आढळले आहेत.
या पाश्र्वभूमीवर परिसरातील अन्य ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून ग्रामस्वच्छता हाती घेतली आहे. मात्र वालचंदनगर ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. या परिसरातील कालवा, वितरिका, मोकळया भागात वाढलेल्या गवतामुळे, शहरातील बाजारतळ सोसायटीसह अन्य भागात खड्डयांत साठलेल्या पाण्यामुळे प्रंचड प्रमाणात डासांची पैदास होत आहे. यामुळे डेंग्यु मोठया प्रमाणावर फैलावण्याची भिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
घरपट्टी वसूल करीत असलेल्या कार्यक्षेत्रतील वाढलेले गवत काढणो. सांडपाण्याची व्यवस्था करणो, पाणी साठणा:या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजविणो, जागोजागी कचराकुंडय़ाची सोय करणो, कचराकुंडय़ातील कच:याची वेळोवेळी विल्हेवाट लावणो, परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरात आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणो, शहर परिसरात दर पंधरा दिवसांनी डास निमरूलन पावडर फवारणी करणो, यांसारख्या ग्रामस्वच्छतेच्या बाबी ग्रामपंचायतीने त्वरित हाती घ्याव्यात, अन्यथा 3क् ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीसमोर धरणो व उपोषण आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रशांत वैशंपायन, रणजित अजरुन पाटील, बसवेश्वर पाटील, नागरी हक्क समितीचे अतुल तेरखेडकर यांनी दिला.