शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे मॉकड्रिल अन् गुंडांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: June 2, 2017 02:16 IST

वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात. मॉक ड्रिलच्या माध्यमातून कायदा, सुव्यवस्था यंत्रणा दक्ष असल्याचे पोलीस दाखवतात. तर नागरिकांवर दहशत राहावी, यासाठी गुंड टोळक्याने फिरून शक्तिप्रदर्शन घडवू लागल्याचे चित्र शहरात पहावयास मिळू लागले आहे. मोरवाडीतील एका मॉलजवळ शनिवारी पोलिसांनी मॉकड्रिल केले. अतिरेक्यांना पकडण्याचे त्यांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) सुरू असताना पिंपरीत गुंडांचे टोळके फेरफटका मारत होते. उंच, तगडे सहकारी घेऊन ते परिसरातून फेरफटका मारून शक्तिप्रदर्शन करीत होते. एकाचवेळी संपूर्ण रस्ता अडवून चालत जाणाऱ्या या टोळक्याकडे या मार्गाने ये-जा करणारे पाहात होते. सुरुवातीला काहीतरी गडबड झाली असावी, भांडणाच्या इराद्याने हे टोळके आले असावे, असे नागरिकांना वाटले. परंतु, भांडणाचा काही प्रकार नव्हता. टोळके असेच फेरफटका मारत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर गुंडही आता स्वत:चे प्रमोशन करू लागले आहेत. कोणातरी डॉनचे छायाचित्र बाजूला आपली छबी झळकावून ते गुंडगिरीचे प्रदर्शन करू लागले आहेत. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेला त्यांचा मित्रपरिवार त्यांना लार्इ््क देऊ लागला आहे. त्यावर कमेंटसही तशाच पडत आहेत. कोणी स्वत:ला वाघ तर कोणी सिंह संबोधू लागला आहे. तरुण मुले अशा ग्रुपवर अधिक सक्रिय झाली असून डॉन,भाई,दादा यांना ते आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर प्रमोशन करणारे काही गुंड नागरी वस्तीच्या परिसरात अनेकदा दहशत पसरविण्याची कृत्य करू लागले आहेत.वाहनांची तोडफोड, जाळपोळीचे प्रात्यक्षिकमॉकड्रिलच्या माध्यमातून पोलीस सतर्क असल्याचे दाखवून देत असताना, गुंडांची टोळकी मात्र दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ याची खरी प्रात्यक्षिके दाखवू लागले आहेत. शहरात घडलेल्या विविध ठिकाणच्या दहशतीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोनशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. मॉकड्रिल करणारे पोलीस बाहेरून येणाऱ्या खऱ्या दहशतवाद्यांनाही पकडतील, परंतु बाहेरच्या दहशतवाद्यांपेक्षा नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक कधी तयार होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.