शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाची प्रकिया थांबविण्याची मागणी, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:21 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादन, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत.

पाटेठाण  - भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादन, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत. परंतु, या भागाला कालव्याने पाणी मिळाले नाही. जमिनी गेल्या अन् पाणीही गेले, अशी अवस्था झाली आहे. परिणामी, धरणग्रस्तांना जमिनीचा ताबा देणार नसून भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित थांबण्यात यावी; अन्यथा गावांगावामध्ये काळी दिवाळी साजरी करून चक्री उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कृती समिती, माहिती सेवा समितीसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.पाटेठाण (ता. दौंड) येथे नुकतीच काही शेतकरी कृती समितीची बैठक झाली. या वेळी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. कालव्याद्वारे खेड, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांना पाणी दिले जाईल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात येऊन भामा-आसखेड धरण प्रामुख्याने शेतीच्या सिचनाच्या पाण्यासाठी बांधण्यात आले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील शेतजमिनी शासनाने आरक्षित केल्या असून सन २०१३मध्ये राहू व लोणीकंद ही दोन गावे वगळता ‘आम्हाला पाणी नको, आमच्या जमिनी पुन्हा परत द्या,’ अशी लेखी पत्रे ग्रामपंचायतींनी दिली.यामुळे बंद पाईपलाईनद्वारे पुण्याला पाणी देण्याचा निर्णय शासनाला सोयीस्कर झाला. अद्याप या भागात कालवा झालेला नाही व पुणे शहराला पाणी दिल्यामुळे धरणात पाण्याची कमतरता निर्माण झाली. जमिनी तर गेल्या; मात्र पाणी मिळाले नाही. सध्या भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून खेड तालुक्यात त्याची सुरुवात झाली आहे. दौंड तालुक्यातील पाटेठाण व दहिटणे भागातदेखील महिन्यात धरणग्रस्तांना जमिनीचा ताबा देणार असल्याचा आदेश असून कार्यवाही देखील सुरू झाली आहे. परंतु भूसंपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे. ती रद्द करावी; अन्यथा बुधवार (दि. ७) पासून परिसरात काळी दिवाळी तसेच च्रकी उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.या वेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षा ज्योती झुरुंगे, भामा-आसखेड कृती समितीचे सचिव विलास डुबे, पुरुषोत्तम हंबीर, गोविंद यादव उपस्थित होते.शेतक-यांवर सरकारकडून होतोय अन्यायदौंड तालुक्यातील शेतकºयांवर सरकार अन्याय करत आहे.आधी आराखड्याप्रमाणे कालव्याने पाणी मिळाले नसून त्यामुळे शेतकय्रांच्या सातबाय्रावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. - संदीप लगड, संस्थापक माहिती सेवा समिती

टॅग्स :Puneपुणे