शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

फत्तेमंगल गढीच्या जीर्णोद्धाराची मागणी

By admin | Updated: May 5, 2017 02:13 IST

फत्तेमंगल गढी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गढीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी

इंदापूर : फत्तेमंगल गढी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गढीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. अतिशय दुरवस्थेत असणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त होणार आहे. इंदापूर, सुपे, चाकण, बारामती या परगण्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणून मालोजीराजे भोसले यांच्या गढीचा मान आहे. निजामशाहीचे सरदार म्हणून मालोजीराजे या गढीतून जहागिरीचा कारभार बघत असत. ते ज्या वेळी मोहिमेवर नसत, त्या वेळी विश्रांतीसाठी त्यांचा या गढीवर मुक्काम असे. या गढीची रचना अतिशय नियोजनबद्ध करण्यात आली होती. गढीला मातीचेच, परंतु अतिशय मजबूत असे आठ बुरूज होते. नजीकच अन्नधान्य साठवणुकीसाठी, शस्त्रसाठा ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मालोजीराजे हे इंद्रेश्वराचे निस्सीम भक्त होते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला नमन करण्यासाठी ते जेव्हा बाहेर येत, त्या वेळी गढीवरून सूर्याबरोबरच इंद्रेश्वराचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. गढीबरोबर इंदापूर शहराचेही शत्रूंपासून संरक्षण व्हावे, याकरिता तट बांधण्यात आले होते. या तटाच्या बाहेर हत्ती, घोडे यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून टाक्या बांधल्या होत्या. या टाक्यांत व इंद्रेश्वर मंदिर परिसरात पाण्याची कमतरता भासू नये, असे नियोजन करण्यात आले होते. आजघडीला टाक्यांची पडझड झाली असली, तरी त्याखालच्या खापरी जलवाहिन्या त्या वेळच्या स्थापत्यकौशल्याची चुणूक दाखवतात. सन १६०५मध्ये आदिलशाहीतील सरदार मिआनराजूच्या सैन्याबरोबर झालेल्या युद्धात मालोजीराजे यांनी देह ठेवला. त्यानंतर आजपर्यंतच्या काळात गढीची पडझड होत गेली. तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्याचा कारभार या गढीतून पाहण्यात येऊ लागला. ज्या शहाशरीफबाबांच्या आशीर्वादमुळे मालोजीराजे यांना मुले झाली त्या बाबांचे अनुयायी चाँदशाहवलीबाबांचा या गढीच्या परिसरातील पुरातन दर्गा ही आणखी एक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभी आहे. बाकी गढीचे बुरूज जमीनदोस्त झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात महसूल यंत्रणेने गढीच्या उत्तरेकडील भागाच्या कोपऱ्याचे यंत्राने सपाटीकरण केले. लोकांना ये-जा करण्यासाठी तेथे रस्ता केला. इतिहासाची वाट मात्र बुजवून टाकली. गढीच्या बुरजांवर व इतर ठिकाणी लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. गढीच्या भोवतीच्या भागात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. (प्रतिनिधी)गढीचे संवर्धन व्हावे, यासाठी एक समिती कार्यरत आहे. या समितीने शिवप्रेमींची एकजूट करून गढीच्या जीर्णोद्धाराकरिता अनेक आंदोलने केली आहेत. गढीसंवर्धनासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याला शासन कधी निधी देते व प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याचीच लोकांना उत्सुकता आहे. इंद्रेश्वर मंदिरात शिळांवर कोरलेल्या पादुका आहेत. त्या मालोजीराजे यांच्या असल्याचे सांगितले जाते. त्यांची पूजा केली जाते.