शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:32 IST

भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.

पुणे : भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या देशांत तांदळाचे उत्पादन घटले. तसेच निर्यातीवरील निर्बंधामुळे बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. भारतातून सुमारे ७० देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. त्यात अमेरिका, आॅस्टेलिया, आफ्रिका, युरोप, रशिया, सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांचा समावेश आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निर्यातीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून त्यातून २३ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले आहे.थायलंड आणि बांगलादेशसह इतर देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे दर कमी होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेपाळ या देशात भारतातील बिगर बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात आली. भारत व आशिया खंडातून परदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या नागरिकांकडून बिगर बासमती तांदळाला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाला तर देशातील तांदळाच्या उत्पादनात १ हजार लाख टनापर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असेही शहा म्हणाले.दरम्यान, केंद्र शासनाने २०१० ते २०११ या कालावधीत भारतातून निर्यात होणाºया बिगर बासमती तांदळावर बंदी घातली होती. बंदी उठविल्यानंतर बासमती व्यतिरिक्त पहिल्याच वर्षी सुमारे ४० लाख टन इतर तांदळाची निर्यात करण्यात आली. २०१६-१७ मध्ये हा आकडा ८० लाख टनावर गेला होता.एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ४० लाख टन बासमती तर ८६ लाख टन बिगर बासमती तांदूळ परदेशात पाठविण्यात आला आहे. भारतात सर्वाधिक उत्पादित होणाºया आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी आदी तांदळाला यंदाही परदेशातील ग्राहकांची पसंती राहिली. गेल्या काही वर्षात पारंपरिक बासमती तांदळाचे उत्पादन घटले असून सुधारित बासमती तांदूळ काही ग्राहकांना न रुचल्याने राज्यासह परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी वाढली आहे.- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष,फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी