जागा मोठ्या खासगी रुग्णालयांना मोफत दिल्या आहेत. अशा रुग्णालयाकडून गरिबांसाठी शासनाच्या मोफत औषध उपचार योजनेअंर्तगत खर्च करण्यात येणाऱ्या निधीची रक्कम उत्पन्नाच्या २ टक्के ऐवजी ४ टक्के करण्याची मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
शिरूर येथील मंगल कार्यालय टाटा स्टिल डाऊन स्ट्रीम प्रोडक्टस ली. आणि प्रहार संस्था व पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी अन्न धान्य किटवाटप व रक्तदान शिबिर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अशोक पवार बोलत होते. या कार्यक्रमास टाटा स्टिलचे बिझनेस हेड व्यंकट पंपटवार, महाराष्ट्र राज्य प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापुराव काणे, उपाध्यक्ष अभय पवार, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी कुरंद, नम्रता गवारे, राणी कर्डिले, लक्ष्मण पोकळे महिंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात टाटा स्टिल डाऊन स्ट्रीम प्रोडक्टस लि. तर्फे सुमारे ४५० दिव्यांगाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. आमदार पवार म्हणाले, दिव्यांगानी आपल्या अडचणीबाबत सांगावे. त्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येईल.