शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांना आंदोलनास मज्जाव, बेमुदत संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:53 IST

नारायणगाव एसटी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक आदी ४ संघटना व कृती समिती यांच्या वतीने  एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा.

नारायणगाव : नारायणगाव एसटी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक आदी ४ संघटना व कृती समिती यांच्या वतीने एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच  पदनिहाय वेतनश्रेणी लागू करावी आदी प्रलंबित मागण्यासांठी दि.१७ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. पहाटेपासून  बस स्थानक पूर्ण रिकामे दिसून येत होते. दरम्यान कर्मचा-यांना बसस्थानक परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आल्याने कर्मचा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .  या आंदोलनात नारायणगाव आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर इनामदार, सचिव गणेश  गाढवे, किशोर शेळके, सुभाष चव्हाण, दत्ता हाडवळे, संतोष नरवडे, अशोक  फुलसुंदर, संजय शेडगे, पूनम हांडे, सीमा बांगर, एल. एम. डोके, सायली परदेशी, पी. एन. राऊत, राजश्री पवार, सीमा वामन, प्रतीक्षा  कोकणे, सुधीर फुंदे, गणेश  रासकर, संजय गाडेकर, मुन्ना पटेल, दत्ता भोईर, प्रकाश राजगडे, संजय थोरात, दौलत शेळके, आरिफ पटेल आदी कर्मचारी सहभागी झाले होते. यासंपात १७९ चालक, १४५ वाहक, ३० वर्कशॉप कर्मचारी  सहभागी झाले होते. या संपामुळे आज ७८० होणा-या फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले, अशी माहिती आगर प्रमुख मगर यांनी दिली. ऐन दिवाळीच्या काळात हा संप पुकारल्यामुळे बाहेर जाणा-या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना स्थानकावरच ताकळत राहावे लागले. लांब पल्यांच्या गाड्या रद्द झाल्याने  प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचता आले नाही. या संपामुळे सामान्य नागरिकांना फटका बसल्याने शासकीय धोरणावर अनेक प्रवासी टीका करत होते.  नारायणगाव आगारातील सर्व कर्मचा-यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला होता. बंदमध्ये सहभाग घेऊन घोषणाबाजी करत जोरदार ठिय्या आंदोलन केले.  सकाळी ८ वा. बसस्थाकासमोरील महामार्गालगत आंदोलकांनी टाकलेला मंडप आगार व्यवस्थापक रामनाथ मगर, स्थानक प्रमुख उज्ज्वला टाकळकर  यांनी पोलीस बळाचा वापर करून काढायला सांगितल्याने आंदोलक कर्मचारी कमालीचे संतप्त झाले होते.  सर्वच आंदोलकांनी तीव्र घोषणा देत या घटनेचा निषेध केला. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले.  

टॅग्स :ST Strikeएसटी संपPuneपुणे