शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’कडून राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील एकूण ८९९ पदाची ...

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील एकूण ८९९ पदाची सरळ सेवेने भरती होणार आहेत. स्वतंत्र निवड मंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पद्धतीने पदे भरणे चुकीचे असून या महत्त्वपूर्ण पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधान परिषदेचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

एमपीएससी ही राज्यातील वर्ग १ व वर्ग २ या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. असे असूनसुद्धा अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंविधानिक आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग १ या पदाची देखील भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाल्याचे दिसते. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती एमपीएससीकडून करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ पदभरती आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीचा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ ताजा असतानाच वर्ग १ या महत्त्वाच्या पदासाठी पुन्हा स्वतंत्र निवड मंडळ नेमून सरकारला घोळात घोळ घालायचा आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील परीक्षेचा निकाल रोखण्यात आला. पुन्हा असाच प्रकार घडला तर विद्यार्थ्यांनाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे एमपीएससीकडून या पदाची भरती करावी. २१ मार्चची राज्य सेवा पूर्व परीक्षा पारदर्शकपणे घेऊन एमपीएससीने क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे जलद भरती प्रक्रिया राबवून परीक्षा घेता येऊ शकते असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोट

“एमपीएससी ही घटनात्मक संस्था असताना स्वतंत्र निवड मंडळाकडून वर्ग १ च्या पदांची भरती करण्यात येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात तत्काळ भरती करायची आहे. एमपीएससीमार्फत जलद प्रक्रिया राबवून पदे भरता येतील. अत्यावश्यक सेवा म्हणून याचा दुरुपयोग होऊ नये. वर्ग ४ च्या भरती प्रक्रियेतील घोळ सर्वांनाच माहिती आहे. वर्ग १ या पदाची जबाबदारी मोठी आहे. एमपीएससीकडून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल.”

- अॅड. निरंजन डावखरे, आमदार, विधान परिषद.

कोट

“काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्यास एमपीएससीला वेळ लागला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने पद भरती एमपीएससीकडून काढून घेतली होती. तसा अधिकार सरकारला आहे. मात्र एमपीएससी ही स्वतंत्र संस्था असताना नवीन मंडळ नेमण्याची आवश्यकता नाही. एमपीएससीची परीक्षा घेण्याची नियमावली आहे. कोरोनामुळे सरकारला आरोग्य विभागात तात्काळ भरती करायची आहे. परंतु दीर्घ काळासाठी एमपीएससी या स्वतंत्र वैधानिक संस्थेकडूनच भरती प्रक्रिया राबविली गेली पाहिजे.”

-मधुकर कोकाटे, माजी अध्यक्ष, एमपीएससी.