शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरच्या तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:24 IST

अवैध वाळूचोरीच्या दंडाची कागदपत्रे जाळल्याचा आरोप : मागणीदार मागासवर्गीय असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ

इंदापूर : अनाधिकृतरीत्या, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याा वाहनासंदर्भातील मूळ कागदपत्रे नष्ट करून बनावट फायली बनवून लाखो रुपये भ्रष्ट व गैरमार्गाने मिळविणाºया इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना तत्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी महसूल व वन विभाग मंत्रालय सचिव यांच्याकडे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मखरे यांनी केली आहे.

याबाबत रत्नाकर मखरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, याबाबत मंत्रालयातील सचिव यांना ( दि. २८ जानेवारी २०१९ ) रोजी रजिस्टर पोस्टाने तक्रार अर्ज, पुराव्याच्या कागदपत्रासह पाठविल्यामुळे चिडून जाऊन इंदापूरचे तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांनी वरीष्ठांचे आदेश डावलून श्री. हर्षल चित्तरंजन पाटील तर्फे कुलमुखत्यार चित्तरंजन वामनराव पाटील यांना गौणखनिज संपत्तीच्या बनावट कागदपत्रे, शिक्के आदी प्रकरणात वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न (दि.३० जानेवारी २०१९) रोजी खनिकर्म/ कावि/२३५०/ २०१८ चे न्याय निर्णयान्वये केला आहे. असा आरोप रत्नाकरजी मखरे यांनी केला आहे.याबाबत मखरे यांनी पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनानिवेदने दिले.‘अजब कारवाई’ वाळू चोरणाराच आरोपी झाला पंच..!तहसीलदारांनी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच ४२-एव्ही ०८९३) हा ४ आॅक्टोबर २०१८ रोजी रात्री १.३० वाजता कलठण ता. इंदापूर येथे पकडला होता. त्याच्या पंचनामा कागदावर आरोपी म्हणून ट्रॅक्टर मालक महेश मारकड हे होते. मात्र पंचनाम्यामध्ये खाली पंच म्हणून देखील महेश मारकड यांचीच सही ? व ट्रक्टर मोकळा आहे असे दाखवून ट्रॅक्टर सोडून दिले.असे कागदपत्रे माहिती अधिकारात देण्यात आले आहेत. ‘राव अजब कारवाई’ वाळू चोरणाराच कसा झाला पंच..! अशी चर्चा इंदापूरमध्ये रंगली आहे.माझ्या वरिष्ठांनी मला जे आदेश दिले आहेत, त्याचे मी तंतोतंत पालन केले असून, त्यानुसार कार्यवाही केली आहे. चार वर्षांपासून सर्व कारवाई चालू आहे. मात्र, सध्या काही प्रकरणे निकाली निघत आहेत. काहींना हा निर्णय मान्य नसेल, तर त्यांनी न्यायालयात कायदेशीर दाद मागावी. - सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूरतहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वाळू व गौणखनिज संदर्भातील सर्व कागदपत्रे माहिती अधिकारात बनावट दिले असून, मुळ कागदपत्रे जाळून टाकले आहेत. मी केवळ मागासवर्गीय असल्याने मला माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, तहसिलदार यांनी शासकीय जमिनी खाजगी लोकांच्या नावे केले आहेत. त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कारवाई कारण्यासाठी जिल्हाधिकारी व आयुक्तालय यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.- रत्नाकर मखरे, माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका

टॅग्स :Puneपुणे