शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टेरेस हॉटेलवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:29 IST

साईड मार्जिनमध्ये तब्बल ८२ हॉटेलचालकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याची माहिती पालिकेच्यावतीने मुख्य सभेत कळवण्यात आली.

पाषाण : बाणेर परिसरात टेरेसवर हॉटेलला परवानगी नसताना सर्रास पत्र्याचे शेड टाकून हॉटेल बांधण्यात आली आहेत, तर साईड मार्जिनमध्ये तब्बल ८२ हॉटेलचालकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याची माहिती पालिकेच्यावतीने मुख्य सभेत कळवण्यात आली.बाणेर बालेवाडी परिसरात हॉटेल व बार रेस्टॉरंटचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही वर्षांत शेकडो हॉटेल या परिसरात तयार झाली आहे. परंतु पालिकेचे नियम धाब्यावर बसवून हॉटेल उभारण्यात आल्याने या परिसरातील सार्वजनिक व्यवस्था वरील ताण वाढला आहे.आॅगस्ट महिन्यात पालिकेच्या मुख्य सभेत या अनधिकृत हॉटेलविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी पालिकेच्या माहितीमध्ये असलेली नऊ टेरेसवर सुरू असलेली हॉटेल व ८२ साईड मार्जिनमध्ये बांधकाम केलेली हॉटेलची माहिती मुख्य सभेत मांडण्यात आली आहे. टेरेसवर हॉटेलला परवानगी अनुज्ञेय नाही असे असतानाही सर्रास अशी हॉटेल चालू का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनधिकृत बांधकाम केलेल्या हॉटेलची संख्या शेकडोच्यावर असताना पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आक्षेप बाणेर बालेवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी घेतला आहे.यामुळे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट एरियात अ हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेची कारवाई योग्यरीतीने होत नसल्यामुळे अनधिकृत हॉटेल बांधली जात आहेत. ही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कायद्याचा प्रश्न निर्माण होतो. अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत.अनाधिकृत हॉटेलमुळे बाणेर परिसरात पार्किंग समस्या, तसेच साऊंड सिस्टीममुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. या हॉटेलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.- स्वप्नाली सायकर,नगरसेविकाअनधिकृत हॉटेलवर कलम ५२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अनधिकृत दारू विक्री करणारे हॉटेल यांच्यावर कोणतेही निर्बंध राहिले नाहीत. टेरेसवर हॉटेलल परवानगी नसताना हॉटेल सुरू आहेत, यावर कारवाई झाली पाहिजे.- ज्योती कळमकर,नगरसेविका

टॅग्स :hotelहॉटेलPuneपुणे