शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

डिलिव्हरी बॉयने दिली ‘टीप’

By admin | Updated: June 18, 2015 00:06 IST

कुरिअर देण्याच्या बहाण्याने शेअर ब्रोकरला कोयत्याचा धाक दाखवून १ कोटी ९६ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकूण

पुणे : कुरिअर देण्याच्या बहाण्याने शेअर ब्रोकरला कोयत्याचा धाक दाखवून १ कोटी ९६ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. हा दरोडा डिलिव्हरी बॉयने माहिती पुरविल्यामुळे टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी अटक आरोपींपैकी सात जणांना १९ जूनपर्यंत, तर चार जणांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (वय २४, रा. स्पाईन रोड, चिंचवड), रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय २४, रा. थेरगाव), बाळू महादेव बनसोडे (वय २२, रा. सद्गुरू सोसायटी, ता. हवेली), समीर गणपत मोरे (वय ३२, रा. काळेवाडी), पंडित प्रभाकर कांबळे (वय २५, रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी), अनिल भानुदास सांगळे (वय २८, रा. त्रिवेणीनगर, निगडी), गुलाब नामदेव नेहरे (वय ४०, रा. सद्गुरूनगर, भोसरी) या ७ जणांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मनोज बाबुलाल यलपूर (वय ४४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), राजेश हनुमंत कांबळे (वय ४१, रा. मिश्रा निवास, नेहरूनगर पिंपरी), सागर महादेव पासलकर (मु. पो. शिरकोळी, ता. वेल्हे, जि. पुणे), राजा वेलेस्वामी पिल्ले (वय ५१, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) या ४ आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अतुल आंबेकर (वय ४०, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ७ मे २०१५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोखलेनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी अतुल आंबेकर यांनी फिर्याद दिली आहे. आंबेकर हे लाईफ जनरल इन्शुरन्स अ‍ॅन्ड ब्रोकर्स कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून अकाउंट असिस्टंट आहेत. तर कंपनीचे मालक साईराम अय्यर आहेत. आरोपी कर्जबाजारी होते. त्यामुळे झटपट पैसे कमविण्याच्या शोधात असलेल्या आरोपींना आंबेकर यांच्या कार्यालयासमोरच्या आॅफिसमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरीबॉयने पैशांची माहिती दिली होती. ही माहिती पासलकर, पिल्ले, कांबळे यांनी गुलाब नेहरे आणि राजेश कांबळे यांना दिल्यावर त्यांनी रेकी केली. (प्रतिनिधी)- घटनेच्या दिवशी कुरिअरवाला असा आवाज देऊन ते कार्यालयात घुसले. चाकूच्या धाकाने आरोपींनी आंबेकर यांचे हातपाय बांधून ठेवत १ कोटी ९५ लाख रुपये लुटले. त्यानंतर परत जाताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, ब्रेसलेट, मोबाईलही चोरुन नेला होता. पुढील तपास चतु:श्रृंंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण सावंत करीत आहेत. सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी चौघाही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.