शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड आणखी सव्वा महिना बंद, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 05:14 IST

सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली.

पुणे : सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली; परंतु काम पूर्ण होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले. पावसाळ्याबरोबरच दिवाळी सुटीमध्येही सिंहगड बंद राहणार आहे.दरड कोसळल्याने वनविभागाने सिंहगडावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. गडावर सतत पडणारा पाऊस व धुके यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले. त्यातच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दुरुस्तीचे काम होत नाही, तोपर्यंत गडावरील वाहतूक सुरू करू नये, असे आदेश दिले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचे काम तत्काळ सुरू केले नाही. परिणामी वनविभागाने एका खासगी कंपनीकडून रस्त्यावर जाळ्या बसविण्याबाबत पहाणी करून घेतली. दोघांच्या भांडणामध्ये रस्त्याचे काम लांबत असल्याने अखेर जिल्हाधिकाºयांनी स्वत:च्या अधिकारात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली.उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, सिंहगडावरील वाहतूक बंद असल्यामुळे पर्यटकांना जाता येत नाही, याचे आम्हाला दुख: होत आहे. काम लवकर सुरू करावे, यासाठीवनविभागाने पुढाकार घेतला होता.वनविभागाकडून गडावर जाणाºया दुचाकीसाठी २० रुपये, तर चारचाकीसाठी ५० रुपये आकारले जातात. शनिवारी व रविवारी गडावर येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असते. गडावरील एकूण वाहनतळाची क्षमता विचारत घेऊन गडावर वाहने पाठविली जातात. गडावर सुटीच्या दिवशी एक हजार ते दीड हजार दुचाकी व ५०० ते ३०० चारचाकी वाहने जातात; परंतु दुरुस्तीमुळे गडावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.दरड कोसळलेल्या भागात जाळी बसविण्याच्या कामास सुरुवात झाली. सुमारे १२५ मीटर भागात जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे; तसेच कोंढणपूर फाटा ते सिंहगडापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यात कामास सुरुवात होणार आहे; परंतु गडावरील रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारीच घेणार आहेत.- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)