शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

थेरगावात दुर्गंधीचे साम्राज्य

By admin | Updated: March 1, 2017 00:37 IST

समर्थ कॉलनी गल्ली नं. ७ मध्ये अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने मैलामिश्रित पाणी भर रस्त्यावर येत आहे

वाकड : थेरगाव परिसरातील पवारनगरमधील समर्थ कॉलनी गल्ली नं. ७ मध्ये अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने मैलामिश्रित पाणी भर रस्त्यावर येत आहे, तर काहींच्या थेट घरात शिरत असल्याने दुर्गंधीचा सामना करीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. समर्थ कॉलनी गल्ली ७ मध्ये सुमारे ८० घरे असून, दोनशे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. येथील वातावरणात दुर्गंधी पसरल्याने नाकाला रुमाल बांधून राहण्याची नामुष्की रहिवाशांवर ओढाली आहे. मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त पाण्याचा लोंढा रस्त्यावर नेहमीच पसरत असल्याने विद्यार्थी, पालक व ज्येष्ठांना कसरत करत पुढे ये-जा करावी लागते. सकाळी आणि सायंकाळी पाणी सुटण्याच्या वेळात दाब वाढल्याने हे दुर्गंधीयुक्त पाणी रहिवाशांच्या थेट घरात जाते. या पाण्यामुळे येथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली असून, अनेक वेळा तक्रारी करूनही निवडणूक झाल्यावर काम करता येईल, असे उडवा-उडवीची उत्तरे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून दिली जातात. मग येथे रहिवाशांचा जीव गेल्यावर महापालिका प्रशासन काम करणार का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. रोगराईचा उद्रेक होण्यापूर्वी जलनिस्सारण विभागाने गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)>चेंबरफुटीमुळे रस्त्यावर पाणीथेरगाव : लक्ष्मणनगर येथे महिन्यापासून चेंबर फुटले आहे व त्यातून दूषित पाणी रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे चेंबर मुख्य रस्त्यात असल्यामुळे पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. तसेच या ठिकाणी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आरोग्य विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. शहरात सध्या डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांनी थैमान मांडले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चेंबर दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.