शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भेंडी, मिरची, गवार, मटारच्या भावात घट

By admin | Updated: October 26, 2015 02:00 IST

मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढल्याने बहुतेक फळभाज्यांच्या भावात घट झाली आहे.

पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढल्याने बहुतेक फळभाज्यांच्या भावात घट झाली आहे. प्रामुख्याने भेंडी, हिरवी मिरची, गवार, मटार, दोडका, कारली, फ्लॉवर, मटार या फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. पालेभाज्यांची आवक कमी असल्याने भाव तेजीत राहिले.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे २०० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दसऱ्यामुळे गुरुवारी शेतमालाची फारशी तोडणी न झाल्याने शुक्रवारी बाजारात आवक कमी झाली होती. परिणामी रविवारी आवक वाढून मागणीही चांगली राहिली. रविवारी भेंडी, गवार, हिरवी मिरची, कारली, मटार या फळभाज्यांचे भाव प्रत्येकी दहा किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर दोडका व फ्लॉवरच्या भावात अनुक्रमे ५० व २० रुपयांची घट झाली. शेवग्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांनी वाढले. इतर फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरच्या भावात शेकडा जुडीमागे रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांची, तर मुळा व कांदा पातच्या भावात सुमारे ४०० रुपयांची वाढ झाली. शेपू, मेथी, पालक, चवळई या भाज्यांचे भाव १०० ते २०० रुपयांनी उतरले.रविवारी घाऊक बाजारात परराज्यातील कर्नाटक येथून ३ ते ४ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसूण, आग्रा येथून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली. स्थानिक भागातून ५०० ते ५५० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, २५ ते ३० टेम्पो फ्लॉवर, १८ ते २० टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, १५० ते १६० गोणी भुईमुग शेंग, ५० ते ६० गोणी मटार, १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळा, नवीन कांदा ५० ट्रक, जुना कांदा ३ ते ४ ट्रक, तळेगावहून बटाटा सुमारे ६ हजार गोणी आवक झाली.फळभाज्यांचे दहा किलोचे भावकांदा : जुना ३००-४००, नवा : २५०-३५०, बटाटा : ९० - १२०, लसूण ५००- ९००, आले : सातारी ३५०, बंगलोर ३००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान २५०-३५०, सुरती २५०-३५०, टोमॅटो : १०० -१४०, दोडका : २५० -३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१२०, चवळी २०० -२५०, काकडी : १५० -२००, कारली : हिरवी २०० -२२०, पांढरी १२०- १४०, पापडी : ३००-४००, पडवळ : १५० - १६०, फ्लॉवर : ५० - १००, कोबी : ४०-१००, वांगी : १५० -२००, डिंगरी : २०० - २५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १८०-२००, तोंडली : कळी १६०-२००, जाड ९० -१००, शेवगा : ७००-७५०, गाजर : २५०-३००, वालवर : ३००-४००, बीट : ८० - १००, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, घोसावळे : १२० -१४०, ढेमसे : १६० -१८०, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार : स्थानिक ८००-९०००, पावटा : ४०० -५००, तांबडा भोपळा : ५०-१००, सुरण : २३०-२५०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : ६०-१००.पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ५००-८००, शेपू : ७००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५०० - ६००, करडई : ५००-६००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ५००-६००, मुळा : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ४००-५००, चवळई: ४००- ५००, पालक: ५००-६००.