शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 06:14 IST

कर्मचारी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला

मुंबई : कर्मचारी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.दीपक मानकर यांच्याकडे अनेक वर्ष काम करत असलेले जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी मानकर व संबंधितांवर जगताप याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आणि अटकसत्र सुरू केले. त्यामुळे मानकर यांनी तातडीने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या न्यायालयाने ६ जून रोजी मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याला मानकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या तीन विविध खंडपीठांनी मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.जितेंद्र जगताप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जयेशने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याचे वडील गेली कित्येक वर्ष मानकर यांच्याकडे काम करत होते. मानकर यांच्या जमिनीच्या व्यवहारांचे काम तेच सांभाळत होते. मात्र, गेले काही महिने रास्ता पेठेतील समर्थ पोलीस ठाण्याच्या समोरील जागेवरून वाद निर्माण झाले होते. संबंधित जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर व बिल्डर वसंत कर्नाटकी त्याच्या वडिलांवर दबाव आणत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.