शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे यश : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:41 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले...

ठळक मुद्दे '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुणे:- जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा मोदी सरकाराचा निर्णय राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रभक्तीतून प्रेरीत आहे.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले. तसेच ३७० कलम आणि 35 अ हे काश्मिरमधून काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वाने हे पाऊल उचलून जनमानसाच्या मनातील खदखदत्या जखमेवर फुंकर घातली, असे मत माजी संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे कलम  370 आणि 35 अ बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, भाई कात्रे, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येताना जिनांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे काश्मिरचा प्रश्न भिजत राहिला. अखंडीत भारताचे स्वप्न या भिजत पडलेल्या प्रश्नामुळे विघटीत होत होते. एकाच देशात राहून दोन झेंडे, दोन संविधान ही रुढ झालेली पद्धत मोदींच्या निर्णयामुळे उखडली गेली. भारताकडून विशेष राज्य म्हणवून घेत विशेष सवलती पदरी पाडत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घ्यायची, पंरतू भारताचे संविधान मान्य करायचे नाही असा दुट्टप्पीपणा स्थानिक राजकीय नेतृत्वाने पिढ्यांन पिढ्या चालविला होता. तत्कालीन राजाने भारतात विलिन होताना टाकलेल्या जटील अटींमुळे काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असूनही त्याच्यावर पाकिस्तान दावा करत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत काश्मिर हा प्रश्न धुमसत ठेवत पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व देखील आपली पोळी भाजून घेण्याचेच काम करीत होते. मुळात पाकव्याप्त काश्मिर हा देखील भारताचाच भाग असून पाकिस्तानच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हा विषय चर्चैत राहत आहे. चीन, रशिया, अमेरीका यांच्यातील आपआपसातील महासत्तांच्या संर्घषामुळे आतंरराष्ट्रीय समुदयाने देखील हा प्रश्न झुलवत ठेवला. भारताशी युद्धाची भाषा करणा-या पाकिस्तान बरोबरत भारताचे एक आठवडा  युद्ध चालले तरी पाकिस्तानात रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान पूर्णत: पोखरला गेला असून ज्या दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले होते, तेच दहशतवादी त्यांची डोकेदुखी ठरली आहे. त्या दहशतवादी प्रतिमेमुळे पाकिस्तान त्याची विश्वासहर्ता गमावून बसला आहे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असताना स्थानिक पातळीवर भारत सरकारने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असताना देखील देशोदेशी टोहो फोडून पाकिस्तान सरकार त्यांच्यावर अन्याय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या नाटकी कोल्हेकुईला मुस्लिम धाजीर्णे सरकार असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला नाही. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ?ॅड.प्रमोद आडकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात त्यांचे विचार मांडले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले....... 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरShripal Sabnisश्रीपाल सबनीसNarendra Modiनरेंद्र मोदी