पिंपरी : महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे. आज चौथी बैठक झाली. येत्या दोन दिवसात यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने समविचारी पक्षाच्या मतांची विभागणी होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. काँग्रेसने सुरुवातीला ५० टक्के जागा त्यानंतर १२८ पैसे ४० जागा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आघाडीसंदर्भात आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या चर्चा झाली. प्रभागनिहाय चर्चा झाली. काँग्रेसने दिलेल्या प्रस्ताव आणि प्रत्यक्षात प्रभागांतील स्थिती यावर चर्चा झाली. याविषयी सचिन साठे म्हणाले, ‘‘आघाडीसंदर्भात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्यात आली आहे. काही जागांबाबत अडचण आहे. मात्र, आघाडी होण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. येत्या दोन दिवसात निर्णय होईल.’’ (प्रतिनिधी)
आघाडीचा दोन दिवसांत निर्णय
By admin | Updated: January 28, 2017 00:24 IST