सांगवी : शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी (दि. ६) शिरवली (ता़ बारामती) येथील रमेश रामचंद्र गिरमे (वय ४७) हे दुचाकी क्रमांक एमएच ४२ डब्ल्यू ७७४८ वरून माळेगाव कारखान्याच्या दिशेने दुध वितरणासाठी निघाले असता काळा ओढा परिसराच्या विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने उस्मान रहिमान शेख (वय ५५) हे दुचाकी (एमएच ४२ डब्ल्यू ३०७०) वरून आपल्या कामानिमित्त निघाले असता़ दोन्ही दुचाकी एकमेकांना जोरधार धडकून दाघेही खाली पडले. बेशुध्द झाले असता दोघांनाही बारामती येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान पुढील उपचार घेण्यासाठी रमेश गिरमे यांना पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू गिरमे यांचा शुक्रवार दिनांक ९ रोजी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला़ तर उस्मान शेख यांचा शुक्रवारी मृत्यू झाला़ झालेल्या या अपघाताने दोघांवरही काळाने घाव घातला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़
बारामती-फलटण रस्त्यावरील अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:54 IST
शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.
बारामती-फलटण रस्त्यावरील अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
ठळक मुद्देकामानिमित्त निघाले असता़ दोन्ही दुचाकी एकमेकांना जोरधार धडकून दाघेही पडले खालीगिरमे यांचा शुक्रवार दिनांक ९ रोजी पहाटे, उस्मान शेख यांचा शुक्रवारी झाला मृत्यू