शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची धडक बसून परभणीच्या तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: April 26, 2017 04:09 IST

परभणीहून पुण्यात रोजगारासाठी आलेल्या एका तरुणाला वाटेतच खडीच्या डंपरची धडक बसून प्राण गमवावे लागले. धायरी गावातील

पुणे : परभणीहून पुण्यात रोजगारासाठी आलेल्या एका तरुणाला वाटेतच खडीच्या डंपरची धडक बसून प्राण गमवावे लागले. धायरी गावातील रायकरमळा येथे २४ तारखेला सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अनिर्बंध पद्धतीने आणि रात्रंदिवस सुरू असलेल्या पाण्याच्या टँकरच्या आणि डंपरच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असताना हा अपघात झाला असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दीपक संजय साळवे (वय २०, रा. मूळ परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे मामा संतोष रोहिदास परिहार (वय २७, दत्ता रायकर चाळ, काळुबाई मंदिराजवळ, रायकरमळा) यांच्याकडे परभणीहून येत होता. घरी जाताना त्याला खडीने भरलेल्या डंपरची जोरदार धडक बसली. त्यात तो जागीच मरण पावला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरचालक सचिन सुरेश मंजुळकर (किरकटवाडी) याला बेदम चोप दिला. तो जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याने संतोष परिहार यांच्या फिर्यादीवरून मंजुळकर याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरिक्षक जयश्री गडकरी तपास करत आहेत.