शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गिर्यारोहकाचे ‘माउंट नून’ मोहिमेत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:09 IST

पुण्यातील आर्किटेक्ट सुभाष टकले (वय ५०) यांचे कारगिल परिसरातील ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प थ्री’ येथे सोमवारी अतिउंचीवर त्रासामुळे निधन झाले.

पुणे : पुण्यातील आर्किटेक्ट सुभाष टकले (वय ५०) यांचे कारगिल परिसरातील ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प थ्री’ येथे सोमवारी अतिउंचीवर त्रासामुळे निधन झाले.दिल्लीस्थित ‘अल्पाईन वाँडरर्स’ या गिर्यारोहण संस्थेकडून पुण्यातील सुभाष टकले व जितेंद्र गवारे, दिल्लीतील नितीन पांडे व जम्मू-काश्मीर येथील गुलजार अहमद हे ‘माउंट नून’ या ७१३५ मीटर उंच असणाºया शिखरावर मोहिमेसाठी जुलैच्या मध्यास रवाना झाले होते. शनिवारी शिखरमाथ्याच्या शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीवर दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे सुभाष टकले यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे वडील, पत्नी व २ मुली असा परिवार आहे. टकले हे पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेशी संलग्न होते.२८ जुलै रोजी सुभाष टकले, जितेंद्र गवारे, नितीन पांडे व गुलजार अहमद यांनी आपल्या ४ शेर्पा साथीदारांसह ‘माउंट नून’च्या शिखर चढाईसाठी सुरवात केली. सर्व जण जेव्हा जवळपास ७ हजार मीटर उंचीवर पोहचले तेव्हा टकले यांना अतीउंचीमुळे थकवा आला. त्यांना पुढे चढाई करणे अवघड जात होते. त्यावेळी टकले यांना तेथेच विश्रांतीसाठी थांबविले व इतर गिर्यारोहकांनी शिखरावर आगेकूच केली. ते शिखराहून परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली. टकले यांना ‘कॅम्प थ्री’वर आणून व त्यांच्याजवळ अन्न-पाण्याची सोय करून जितेंद्र गवारे ताबडतोब मदतीसाठी ‘बेस कॅम्प’कडे परतला. रविवारी सकाळी ‘बेस कॅम्प’ला पोहोचताच त्याने मदतीसाठी पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेशी संपर्क साधला तसेच जवळच असलेल्या पानिखेर येथील भारतीय सैन्य दलाच्या तळावर जाऊन मदतीसाठी विनंती केली. ‘गिरिप्रेमी’ने रेस्क्यू आॅपरेशनची सूत्रे हातात घेऊन एक पथक लेहला पाठविले. यात गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे व टकले यांचे सहकारी संदीप बंब यांचा समावेश होता. ‘गिरिप्रेमी’चा दिनेश कोतकर मोहिमेसाठी लेहलाच असल्याने त्याची या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये मदत झाली.या हेलिरेस्क्यूसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने मदत करून भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील भारतीय सैन्य दलाच्या अधिकाºयांनी या आॅपरेशनमध्ये सहकार्य केले. दुर्दैवाने हेलिकॉप्टर रेस्क्यू टीम ‘कॅम्प थ्री’वर पोहचेपर्यंत सुभाष टकले यांचा मृत्यू झाला होता.