मृत भिक्षेकरी निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:23+5:302021-02-24T04:12:23+5:30

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली की साधारण ४० वर्षांचा मध्यमवयीन पुरुष पुलाखाली मृतावस्थेत ...

The dead beggar went corona positive | मृत भिक्षेकरी निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

मृत भिक्षेकरी निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

Next

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली की साधारण ४० वर्षांचा मध्यमवयीन पुरुष पुलाखाली मृतावस्थेत सापडला आहे. हा पुरुष मूळचा गोरखपूर उत्तर प्रदेश येथील असून त्याला ओळखणारे काही जण वारजे व आसपासच्या परिसरात आहेत. त्याच्या एका नातेवाईकांकडे चौकशी केल्यावर त्यास आईवडील किंवा कुटुंबात कोणीही नव्हते. गावाला त्याचा फक्त एक भाऊ राहत आहे. काहीसा विमनस्क अवस्थेत तो भटकंती करीत असल्याचे त्यास ओळखणारे अनेकांनी माहिती दिली. मागील अनेक वर्षे तो गावाला ही गेला नव्हता. त्याचे आई वडील वारले तेव्हाही तो इथेच होता. यावरून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे दिसून येत आहे.

पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामदास शेवते, उपनिरीक्षक अशोक येवले, अभिजित काळे कर्मचारी चव्हाण यांनी याठिकाणी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला.

Web Title: The dead beggar went corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.