शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 02:56 IST

नागरिकांच्या उत्साहाने वाहतूककोंडीत भर

पुणे : दिवाळी अगदी तोंडावर आलेली असताना शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठून खरेदीसाठी नागरिकांनी सहकुटुंब शहराच्या मध्यवस्तीतगर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे आज सकाळपासूनच लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येत होते. त्यात आज गणेश चतुर्थी असल्याने दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने आल्याने या वाहतूककोंडीत आणखीच भर पडली.दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील अल्पना चित्रपटगृहानजीक असलेल्या नागझरी नाल्याच्या परिसरातील पुलाचे काम महापालिकेकडून करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारपासून या भागातील वाहतूक वळवण्यात आली. लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आल्याने बस संत कबीर चौकातून पॉवर हाऊस चौकातून दारूवाला पूलमार्गे वळून पुन्हा लक्ष्मी रोडवर आल्या. त्यामुळे फडके हौद, गणेश रोड ते जिजामाता चौक दरम्यान सायंकाळनंतर मोठी कोंडी झाली.सायंकाळनंतर लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिळक रोड भागातील वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरातील वाहनतळावर वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने दुपारनंतर वाहनतळ बंद ठेवण्यात आला होता. कपडे खरेदीसाठी नागरिकांनी लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड भागात गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील दुकाने खुली होती.नियोजन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळदिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहराच्या मध्य भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. अल्पना चित्रपटगृह परिसरात नाल्यावरील पुलाचे काम करण्यात येत आहे.दिवाळी खरेदीसाठी गर्दी, पुलाच्या कामामुळे शनिवारी या भागातील वाहतूक विस्कळीत झाली़ खरेदीसाठी आलेले नागरिक व गणेश दर्शनासाठी आलेले भाविक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

टॅग्स :DiwaliदिवाळीPuneपुणे