शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

दिवस दुर्घटनांचा; ५ जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 21, 2015 22:37 IST

गोहे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेतील इ.६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या सानिया वाळकोळी या आदिवासी मुलीचा आज (ता.२१) अपघाती मृत्यू झाला.

डिंभे : गोहे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेतील इ.६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या सानिया वाळकोळी या आदिवासी मुलीचा आज (ता.२१) अपघाती मृत्यू झाला. नातेवाइकांसोबत घरी जाताना मोटारसायकलवरून पडून डोक्याला मार लागल्याने या मुलीचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आहुपे, आसाणे, तेरूंगण, राजपूर व गोहे येथे इ.पहिलीपासून १०वी पर्यंत निवासी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांतील आदिवासी मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्वयंपाकी, कामाठी, वाचमन, अधीक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणविस्तार अधिकारी इत्यादी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या असतात. निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलामुलींवर देखभाल करण्यासाठी मुलांच्या वसतिगृहावर अधीक्षक तर मुलींच्या वसतिगृहावर स्त्री अधीक्षिकेची नेमणूक केलेली असते. शाळा प्रवेशावेळी ज्या पालकांची ओळख दिली आहे त्याच पालकांसोबत मुलांना घरी सोडण्याचा नियम आहे. परंतु अनेकदा असे न होता वसतिगृहावर देखभालीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करून इतर पालकांसोबतही मुलांना घरी सोडले जाते. गोहे (ता.आंबेगाव) येथील आश्रमशाळेतील काल घडलेल्या घटनेमध्येही मुलगी जवळच्या नातेवाइकासोबत वाल्मीकवाडी येथे असणाऱ्या आपल्या घरी निघाली होती. घोडेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालकाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने ही मुलगी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने मरण पावली आहे. (वार्ताहर)सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू४इंदापूर : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील वृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. कलावती नामदेव दगडे (वय ८०) असे या वृद्धेचे नाव होते. शनिवारी (दि.२१) सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे दगडे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.पारवडीत ऊसतोडणी कामगार महिलेची आत्महत्या ४बारामती : पारवडी (ता. बारामती) येथील ऊसतोडणी कामगार महिलेने शनिवारी (दि.२१) दुपारी ३ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ४याबाबत त्यांचे नात्ोवाईक माणिकचंद्र गव्हाणे (रा.पुणेकर वस्ती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. सुनीता अदिनाथ माळी (वय २५, सध्या रा. पुणेकर वस्ती, पारवडी, मूळ रा.कुमशी, ता. जि. बीड) या महिलेने उसाच्या शेतालगत असलेल्या चंदनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विहिरीत आढळला महिलेचा मृतदेहशिरसगावकाटा : येळेवस्तीतील विहिरीत तरूण विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी ३ पासून हा मृतदेह पाण्यात दिसून आला. मृत महिलेचे नाव सुनीता सोपान येळे (वय २२, मूळगाव हिंगेवाडी, ता. श्रीगोंदा) आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. नीरा डाव्या कालव्यात बालक वाहून गेला४बारामती : बारामती शहरातून वाहत असलेल्या नीरा डावा कालव्यात बालक वाहून गेल्याची घटना तीन हत्ती चौकात शनिवारी (दि.२१) घडली.४पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बालकाचे आजोबा दिवाणसिंग बुद्धिसिंग चितोडिया यांनी खबर दिली आहे. त्यानुसार जिकंदर चितोडीया (वय ६) हा बालक शनिवारी (दि.२१) सकाळी नीरा डावा कालव्यालगत खेळत होता. मात्र, खेळताना तोल जाऊन तो कालव्यातील पाण्यात पडून वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या बालकाचा शोध घेण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी देखील या शोधकार्यात सहभाग घेतला.