शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दौंड, इंदापूर, बारामतीला आज मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:54 IST

पालिकेमुळे रखडले शेतीचे आवर्तन; शेतकऱ्यांच्या नजरा कालव्याकडे

पुणे : कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून अद्याप कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. पालिकेने रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटण्याची दुर्घटना घडल्यामुळे जलसंपदा विभाग व पालिका प्रशासनातर्फे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दुरूस्तीची कामे संस्थ गतीने सुरू असल्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सोडता आले नाही. कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, रविवारपासून पाणी सोडण्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून जनता वसाहत येथे कालवा फुटल्याच्या बाजूला राम मंदिराजवळ संरक्षक भिंत उभारण्याचे काम शनिवारपर्यंत सुरू होते. भिंत बांधून झाली असली तरी कालव्यामध्ये उतरवण्यात आलेली यंंत्रसामुग्री, इतर साहित्य बाहेर काढण्याचे शनिवारपर्यंत सुरू होते. रात्री उशीरापर्यंत किंवा सकाळी हे साहित्य काढून रविवारी दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे,असे खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार यांनी सांगितले.शेलार म्हणाले,पाटबंधारे विभागाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे.मात्र,पालिकेकडून अजूनही दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत.पालिकेकडून दुरूस्तीच्या कामासाठी कालव्यात टाकण्यात आलेली माती अद्याप काढण्यात आली नाही.पालिकेने सकाळी लवकर हे काम पूर्ण केल्यास दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडता येईल.खडकवासल्यातून प्रथमत: ६०० ते ७०० क्यूसेक पाणी सोडण्यात येईल.पाणी सोडल्यानंतर कालव्याला काही धोका आहे का? याची पहाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांकडून केली जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्याने ३०० क्यूसेकने पाणी वाढविले जाईल.कालव्यातून १,३०० क्यूसेकपर्यंत पाणी वाढविले जाईल.महिनाभर कालवा दुरूस्तीचे काम बंद सुरू असल्यामुळे शेतक-यांचे खरीपाचे आवर्तन बंद करावे लागले.मात्र,रब्बी हंगामासाठी 15 आॅक्टोबरपासून पाणी सोडले जाणार होते.परंतु,दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने दौंड,इंदापूर,बारामतीसाठी पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत.अखेर रविवारी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :mula muthaमुळा मुठा