शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यास दौंडच्या शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हे पाणी या योजनेसाठी जाणार असल्याने नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत गोंधळ निर्माण झाला. यामुळे ...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हे पाणी या योजनेसाठी जाणार असल्याने नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत गोंधळ निर्माण झाला. यामुळे दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. मूळ आराखड्यानुसार पुणे महानगरपालिकेतून साडेअकरा टीएमसी पाणी बेबी कॅनालद्वारे दौंडकरांना देण्याचा करार आहे. परंतु प्रत्यक्षात तेवढे पाणी दौंडकरांना मिळत नाही. हे पाणी पाटस, वरवंडपर्यंत येते. तसेच मुळा-मुठा नदीद्वारे येणारे पाणी उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाल्याने नानगाव, कानगाव गावापर्यंत राहते. त्यामुळे दौंडचा पूर्व भाग हा सर्वस्वी उजनी धरण क्षेत्रावरती आहे. हा फुगवठा खोरवडी, देऊळगाव राजेपर्यंत आलेला आहे. इंदापूरकरांनी पाणी पळवल्यास दौंडकरावर अन्याय होईल. हजारो एकर शेती भविष्यामध्ये नापीक होण्याचा धोका आहे. आराखड्यामध्ये ११ टीएमसी पाणी दौंडकरांना मंजूर असताना त्यापैकी ५ टीएमसी पाणी इंदापूरकरांनी आपल्या नावे करून घेतले आहे. खडकवासल्याचे पाणी इंदापूरकरांनी तरंगवाडी तलावपर्यंत नेले व त्यानंतर शेतीसाठी वापर करण्यास सुरुवात केली.

खडकवासला प्रकल्प होताना तेथील शेतकर्‍यांचे पुनर्वसन दौंड तालुक्यामध्ये झालेले आहे. इंदापूरमध्ये एकाही शेतकर्‍यांचे पुनर्वसन झालेले नाही. भविष्यात शासनाने उजनी धरण क्षेत्रातील हे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेल्यास खडकवासला मुख्य कालव्यातून इंदापूरला जाणारे पाणी बंद करणे गरजेचे आहे. इंदापूरकरांचा दोन्ही बाजूने पाणी पळवण्याचा दौंडकर कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. तसेच हे पाणी पुणे महानगरपालिका किंवा अन्य तालुक्यांना ही वापरून देणार नाही. भविष्यात या पाण्याबाबत पळवापळवी झाल्यास झाल्यास या पाण्यासाठी दौंडकरांच्यावतीने जनआंदोलन उभारले जाईल, अशी माहिती महेश भागवत यांनी दिली.