शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Updated: October 17, 2015 01:07 IST

भिवडी (ता. पुरंदर) मोकाशीवस्ती (बोरमळा) येथील पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला

नारायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) मोकाशीवस्ती (बोरमळा) येथील पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. त्या वेळी रमेश मोकाशी यांची आई लीलाबाई दशरथ मोकाशी (वय ६७) यांनी चोरट्यांना विरोध केला असता मारहाणीत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मोकाशी यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत, कानातील कुड्या व रोख वीस हजार रुपये असा ऐवज दरोडेखोरांनी पळविला. रमेश दशरथ मोकाशी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश मोकाशी यांचे घर भरवस्तीत आहे. घराच्या मागील शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य ठेवण्याच्या खोलीचा दरवाजा उघडून घराची खिडकी उचकटून चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. मात्र बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने चोरट्यांनी भिंतीवर चढून शेजारील देवघरात प्रवेश केला. त्याठिकाणी लीलाबाई एकट्या झोपल्या होत्या. चोरट्यांनी देवघरातील कपाटातील रोख रक्कम २० हजार आणि गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत, कानातील कुड्या हिसकावून घेतल्या. त्यानंतर बाहेरील खोलीत प्रवेश केला. त्याठिकाणी दोन कपाटे होती, तीही उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची चावी नसल्याने चोरट्यांनी लीलाबाई यांच्याकडे चावीची मागणी केली असावी; पण त्या कपाटाच्या चाव्या रमेश मोकाशी (मुलाकडे) यांच्याकडे असल्याने त्यांनी ‘नाही’ असे सांगितले असावे. त्यानंतर चिडून जाऊन देवघरातील कपाटातील दोन ते अडीच फुटाचा कोयता काढून त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. घटनेची माहिती मिळताच भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड आपल्या कर्मचाऱ्यांसह हजार झाले. तलाठी गणेश महाजन, ग्रामसेवक एन. डी. शिवरकर उपस्थित होते. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ११ वाजता घटनास्थळी हजर राहून परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. >> आर्थिक फसवणूक, सायबर गुन्ह्यांमध्येही जिल्ह्यात वाढ झाली. यापार्श्वभुमीवर ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्हयात आजपासून जनजागृती मेळावे घेण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, गुन्हे वाढतच आहेत. चड्डी व बनियान घातलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने मरकळ (ता. खेड) येथील बाजारेवस्तीवर गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घातला. त्यात बाप लेकांना जखमी केली. ही घटना ताजी असतानाच पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे दरोड्याची घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच दिले आहे. >>सासवड नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा निलीमा चौैगंडे यांच्या घरावरही आट महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. यात २८ तोळे सोनं चोरट्यांनी लुटले होते. यातील पाच आरोपींना पकड्यात पोलिसांना यश्इथा आले आहे. मात्र फक्त चार तोळे सोनेच त्यांच्याकडून मिळाले आहे. >>फिंगर प्रिंट अधिकारी डी. आर. शेख यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणचे बोटांचे ठसे घेतले आहेत. सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४६० नुसार गुन्हा दाखल केला आहे.